घरमनोरंजनVideo: फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टीने केलेल्या योगा स्टेप व्हायरल

Video: फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टीने केलेल्या योगा स्टेप व्हायरल

Subscribe

शिल्पा शेट्टीला तिच्या अभिनयाने नाही तर, तिच्या फिटनेससह उत्तम असणाऱ्या ड्रेसिंग सेन्सकरिता देखील ओळखले जाते

बॉलिवूड अभिनेत्री आणि फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेसमुळे नेहमी प्रकाशझोतात असते. अभिनेत्री शिल्पा शेट्टीला तिच्या अभिनयाने नाही तर, तिच्या फिटनेससह उत्तम असणाऱ्या ड्रेसिंग सेन्सकरिता देखील ओळखले जाते. सोशल मीडियावर शिल्पा नेहमीच अॅक्टीव असते. सोशल मीडियावर शिल्पा तिचे वर्कआऊट, योगाच्या फोटो आणि व्हिडिओमुळे नेहमीच चाहत्यांच्या चर्चेत असते.

- Advertisement -

तिचे जिम मधील वर्कआऊट करतानाचे वेगळे-वेगळे लूक नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री शिल्पाचा लेटेस्ट व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून त्यात शिल्पा योगा करताना दिसत आहे.

- Advertisement -

आपल्या आरोग्याची काळजी घेणारी अभिनेत्री आहारतज्ज्ञ असल्याने नेहमीच आहार, आरोग्याच्या टिप्स आपल्या चाहत्यांसह सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे लाखो फॉलोअर्स आहेत जे इंस्टाग्रामवर फॉलो करत असतात.

शिल्पा शेट्टीचे यूट्यूब चॅनल असून त्यावर देखील शिल्पा फिटनेस आणि वर्कआऊटचे व्हिडिओ शेअर करत असते. यामुळे शिल्पा आपल्या चाहत्यांना फिट राहण्यास प्रेरित करते. नुकताच सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो, व्हिडिओतील शिल्पाचा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसतोय.

२१ जूनला होणाऱ्या योग दिवसाची तयारी सुरू असताना शिल्पा गुलाबी रंगाच्या कपड्यात योगा करताना बघायला मिळाली. योगा हा शिल्पाच्या दिनचर्येतील महत्त्वाचा भाग आहे. नुकताच रविवारी शिल्पाने सुरतमध्ये आयोजित केलेल्या योगसभेत देखील सहभाग घेतला होता. यात ३००० लोकांना योगसाधना करण्यास प्रोत्साहन दिले. फिटनेस आयकॉन असणाऱ्या शिल्पाने अनेकांकडून योगा करून घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -