Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग शिल्पा शिरोडकर ठरली कोरोनाची लस घेणारी पहिली सेलिब्रिटी

शिल्पा शिरोडकर ठरली कोरोनाची लस घेणारी पहिली सेलिब्रिटी

सोशल मिडियातून शेअर केला अनुभव

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकर कोरोनाची लस घेणाऱ्या भारताच्या पहिल्या सेलिब्रिटी ठरल्या आहे. दुबईमध्ये त्यांनी ही लस घेतली आहे. सोशल मिडियाच्या माध्यामातून शिल्पा शिरोडकर यांनी चाहत्यांनी ही माहिती शेअर केली. कोरोना संकटात केलेल्या सहकार्याबदद्ल त्यांचे सोशल मिडियातून कौतुक होत आहे. शिल्पा यांनी इस्टांग्रामवरुन कोरोना लस घेतल्याचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांच्या हातावर एक पट्टी बांधण्यात आली आहे. आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, लसी घेऊनही मी सुरक्षित आहे. हे न्यू नॉर्मल आहे. धन्यवाद यूएई. शिल्पा शिरोडकारांचा हा फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच कमेंट बॉक्समधूनही कौतुक केले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shilpa Shirodkar (@shilpashirodkar73)

- Advertisement -

शिल्पा शिरोडकर या दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. २००० मध्ये त्यांनी युकेचे बेस्ड बँकर अपरेश रंजीत यांच्याशी लग्न केले. त्यानंतर त्या कुटुंबासह दुबईत स्थायिक झाल्या. ‘भष्ट्राचार’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, रेखा यांच्यासह त्या मुख्य भूमिकेत झळकल्या. ९० च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. कन्हैयास योद्धा, हम, गोपी किशन, दिल ही तो है जैसी या चित्रपटांचा समावेश होता. शेवटच्या ‘गॅन्स ऑफ बनारस’ या चित्रपटात झळकल्या होत्या.

 


- Advertisement -

हेही वाचा – Breast Implant सर्जरीत मृत्यू खूपच जवळून पाहिला, अमेरिकन मॉडेलचा थरारक अनुभव


 

- Advertisement -