‘शिल्पा supports पप्पू’, फॅन्सचा धुमाकूळ

शिल्पा शिंदेचं काँग्रेसमध्ये प्रवेश करणं हा एक पब्लिसिटी स्टंट असल्याची टीका अनेकांनी केली आहे.

Mumbai
Shipa shinde gets trolled on social media after joining Congress

छोट्या पडद्यावरील सर्वांची लाडकी ‘भाभीजी’ आणि ‘बीग बॉस ११’ फेम शिल्पा शिंदे सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. शिल्पाने नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे टेलिव्हिजन क्षेत्रात आणि राजकीय वर्तुळात तिच्याच नावाची चर्चा आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिल्पाने काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शिल्पाने राजकारणात प्रवेश केल्यानंतर  एक पत्रकार परिषदही घेतली. ‘भविष्यात संधी मिळाली तर निवडणुक लढवेन’ अशी इच्छाही तिने यावेळी बोलून दाखवली. एकीकडे शिल्पाच्या राजकीय प्रवेशामुळे तिचे फॅन्स भरभरुन तिचं कौतुक करत आहेत. मात्र, दुसरीकडे काही नेटिझन्सनी शिल्पाला सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे.

शिल्पा शिंदेचं काँग्रेसमध्ये प्रवेश करणं हा एक पब्लिसिटी स्टंट असल्याची टीका अनेकांनी केली आहे. तर काही जणांनी शिल्पाचं राजकारणात आवडलं नसल्याचं म्हणत याविषयी नाराजी व्यक्ती केली आहे. एका व्यक्तीने तर ‘शिल्पा यापुढे पप्पूला सपोर्ट करणार याची खंत आहे‘ असं म्हणत त्याती नाराजी व्यक्त केली आहे. पाहुया, शिल्पाच्या काँग्रेस प्रवेशावर लोकांचं नेमकं काय म्हणणं आहे ते…