बिग बॉसची ड्रामा क्वीन करणार चित्रपटात पदार्पण

बिग बॉस सीझन २ नंतर ड्रामा क्वीन म्हणजेच शिवानी सुर्वे ही चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटील येणार आहे.

Mumbai
shivani surve new upcoming movie after bigg boss marathi
बिग बॉसची ड्रामा क्वीन करणार चित्रपटात पदार्पण

अभिनेत्री शिवानी सुर्वेचा देवयानी ते बिग बॉस पर्यंतचा प्रवास आपण पाहिलाच आहे. सध्या शिवानी ही बिग बॉसच्या घरात धुमकूळ घालत आहे. तसेच ती सर्वाधिक स्ट्राँग कंटेस्टंट म्हणून ओळखली जात आहे. २०१९ हे वर्ष शिवानी सुर्वेसाठी करियरचा टर्निंग पॉईंट ठरले आहे. बिग बॉसच्या घरातल्या सह-स्पर्धकांची आणि आपल्या चाहत्यांचीही लाडकी ठरलेल्या शिवानीची बिग बॉसनंतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये घोडदौड चालूच राहताना दिसणार आहे. गेल्या दहा वर्षातल्या यशस्वी टिव्ही कारकिर्दीमध्ये शिवानीने बिग बॉस मराठी हा रिएलिटी शो केला. आपल्या पहिल्याच रिएलिटी शोमधून शिवानीने रसिकांची मनं जिंकली. आता टेलिव्हिजन रसिकांची मनं जिंकल्यावर शिवानी सुर्वे सिनेरसिकांवरही आपली मोहिनी घालायला येणार आहे.

ऑक्टोबर महिन्यात शिवानीचे दोन मोठे सिनेमे रिलीज होत आहेत. अंकुश चौधरीसोबतचा ‘ट्रिपल सीट’ आणि हेमंत ढोमे लिखित-दिग्दर्शित ‘सातारचा सलमान’ हे दोन्ही सिनेमे ऑक्टोबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. शिवानीच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच डबल गुड न्यूज आहे.


नक्की वाचा‘या’ व्यक्तीमुळे स्टेशनवर गाणारी रानू मंडाल बनली बॉलिवूड गायिका


२०१६ला शिवानीचा घंटा हा सिनेमा आला होता. त्यानंतर आता तीन वर्षांनी ती रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. रूपेरी दूनियेत परतताना एकाच महिन्यात तिच्या दोन फिल्म्स प्रदर्शित होत आहेत. ११ ऑक्टोबरला सातारचा सलमान तर ट्रिपल सीट हा चित्रपट २४ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. त्यामुळे शिवानीच्या ह्या सोनेरी भेटीने तिच्या चाहत्यांची दिवाळी नक्कीच धमाकेदार होईल.

सूत्रांच्या माहितीनुसार, शिवानी सुर्वे ही बिग बॉस मराठीतून बाहेर पडणारी एकुलती एक अशी कंटेस्टंट आहे. ती बाहेर पडताच तिचे दोन मोठे सिनेमे पाहायला मिळणार आहेत. बिग बॉसच्या घरातून प्रकृतीच्या कारणास्तव ब्रेक घेऊन घरी काही काळासाठी परतलेल्या शिवानीला अजून दोन मोठ्या फिल्ममेकर्सकडूनही सिनेमाच्या ऑफर्स आल्या आहेत. ज्यावर आता शिवानी बिग बॉसच्या ग्रँड फिनालेनंतर घरातून बाहेर आल्यावर विचार करेल.


हेही वाचासलमान खानच्या ‘इन्शाअल्लाह’चा मुहुर्त टळला