स्र्किनवर ‘सेक्स’ दाखवणे गुन्हा नाही- एकता कपूर

'गेम ऑफ थ्रोन्स' आणि 'हॅरी पॉटर'ची मी मोठी फॅन आहे. या सिनेमातही काल्पनिक विश्व आहे. तसाच  प्रयत्न मी 'नागिन'सारख्या सिरिअलच्या माध्यमातून केला आहे.

Mumbai
apharan_by_ekta_kapoor
एकता कपूरच्या 'अपहरण' वेबसीरिजचे पोस्टर

टीव्ही मालिकांमधून घराघरात पोहोचलेली बालाजी फिल्मजची एकता कपूर आता वेब सीरिजमधून लोकांचे मनोरंजन करत आहे. तिची ‘अपहरण’ ही वेब सीरिजदेखील अल्टबालाजीवर येणार आहे. नुकताच याचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या वेबसीरिज निमित्ताने घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत एकताने तिच्यावर झालेल्या आरोपांचे चांगलेच उत्तर दिले आहे.’स्र्किनवर सेक्स दाखवणे वाईट नाही’ असे बेधडकपणे सांगून तिने त्यामागील कारणे देखील सांगितली आहेत.

‘हो मी टीव्हीवर सेक्स दाखवते’

एकताला पत्रकारांनी तुमच्या मालिकांमध्ये नेहमीच सेक्स आणि अंधश्रद्धा पसरवणाऱ्या गोष्टी का असतात, असा प्रश्न केला. त्यावर एकता म्हणाली की, ‘हो मी माझ्या मालिकांमधून सेक्स दाखवते याचा मला आनंद आहे. पडद्यावर ते दाखवण्यात वाईट काय आहे. खरंतरं सेक्सबद्दल आपल्याला इतके वाईट वाटायला नको. आपली एकच समस्या आहे ती म्हणजे आपले दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत. संमतीने होत असलेल्या सेक्सला विरोध करण्यापेक्षा ज्यांच्यावर बळजबरी केली जाते आपण त्यांचा विरोध केला पाहिजे, असे देखील एकता म्हणाली.

बॉलीवूडमधील काल्पनिक विश्व चालते, हिंदीत का नाही?

‘गेम ऑफ थ्रोन्स’ आणि ‘हॅरी पॉटर’ची मी मोठी फॅन आहे. या सिनेमातही काल्पनिक विश्व आहे. तसाच  प्रयत्न मी ‘नागिन’सारख्या सिरिअलच्या माध्यमातून केला आहे. त्यात काय चुकले? त्यांचे बजेट फार मोठे आहे तर आपले बजेट तितके नसल्यामुळे त्यांच्या इतका सरसपणा त्यात येत नसेल पण ते करण्याचा प्रयत्न केला आहे, याचा आनंद आहे. एखाद्या लोकप्रिय गोष्टींमध्ये चुका या काढल्या जातातच त्यामुळे त्यात काही वावगे नाही.

घेऊन येत आहे ‘अपहरण’ नावाची मालिका

एकता कपूर अल्ट बालाजीवर तिची नवी वेब सीरिज ‘अपहरण’ घेऊन येत आहे. या वेब सीरिजमध्ये अरुणोदय सिंह, निधि सिंह आणि माही गिल ही स्टारकास्ट असणार आहेत.