‘इको फ्रेंडली गणेशोत्सव’ साजरा करा; श्रद्धा कपूरची विनंती

यंदा 'इको फ्रेंडली गणेशोत्सव' साजरा करावा, अशी विनंती अभिनेत्री श्रद्धा कपूरने केली आहे.

Shraddha Kapoor
श्रद्धा कपूर

सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रद्धा कपूरने भक्तांना एक विनंती केली आहे. या पोस्टमधून तिने यंदाच्या वर्षी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करावा, अशी विनंती केली आहे. श्रद्धाने पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. तिने व्हिडीओ शेअर करुन पर्यावरणाची कशी हानी होते ते दाखवले आहे आणि पर्यावरण बाप्पा घरी आणा, असे त्यात म्हटले आहे.

श्रद्धा मराठमोळ्या कुटुंबातील असल्याने तिच्या घरी गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जातो. मात्र, यंदा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तिने पर्यावरणाची हानी कशी होते ते दाखवले आहे आणि पर्यावरणपूरक बाप्पा घरी आणा, असे देखील म्हटले आहे.

विशेष म्हणजे श्रद्धा कपूर ही पर्यावरणप्रेमी आहे. ती नेहमी सोशल मीडियातून आपले मत व्यक्त करत असते. त्याचसोबतच ती प्राण्यांच्या हक्कासाठीही ती नेहमी आवाज उठवते. काही दिवसांपूर्वी प्राण्याच्या हिंसेविरोधातील मोहिमेत ती सहभागी झाली होती.


हेही वाचा – रोहित – मानसी रॉय ‘लॉक्ड इन लव’द्वारे प्रेक्षकांच्या भेटीला