या विनायक चतुर्थीपासून ‘श्री गणेश’ येणार भेटीला

बाप्पा आता पुन्हा एकदा सर्वांच्या भेटीला येणार आहे.

Mumbai
shree ganesh marathi mythological serial to start again on star pravah
या विनायक चतुर्थीपासून 'श्री गणेश' येणार भेटीला

लॉकडाऊनमध्ये दुरदर्शनवर पुन्हा एकदा ९० च्या दशकातील गाजलेला मालिका प्रदर्शित केल्या जाऊ लागल्या आणि प्रेक्षकांनी या मालिकांना भरघोस प्रतिसाद दिला. रामायण, महाभारत या पौराणिक मालिकांना पुन्हा एकदा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. तसेच शूटिंग बंद असल्यामुळे यासोबतच इतरही वाहिन्यांवर जुन्या गाजलेल्या मालिका पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत. त्यातच आता आणखी एका प्रेक्षकांची आवडती मालिका पुन्हा एकदा प्रसारित होणार आहे.

लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचे लाडके आणि आवडते दैवत म्हणजे गणपती बाप्पा. हा बाप्पाच आता पुन्हा एकदा सर्वांच्या भेटीला येणार आहे. या विनायक चतुर्थीपासून म्हणजेच २६ मे पासून ‘श्री गणेश’ ही पौराणिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. बाप्पाच्या जन्माची कथा आपण ऐकली आहेच. ही गोष्ट स्टार प्रवाहवरच्या ‘श्री गणेश’ मालिकेतून पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. निर्माते धीरज कुमार यांनी काही वर्षांपूर्वी या पौराणिक मालिकेची निर्मिती केली होती. या मालिकेचा प्रेक्षकांना आनंद घेता येणार आहे.


हेही वाचा – मराठी चित्रपटसृष्टच्या मदतीला माधुरी दीक्षित आली धावून


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here