दुसऱ्यांदा घरगुती हिंसेचा बळी ठरली श्वेता तिवारी; पती अभिनवला अटक

दारुच्या नशेत अनेकदा श्वेता आणि मुलगी पलकला मारहाण

Mumbai

‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेत प्रेरणा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री श्वेता तिवारी ही तिच्या खाजगी आय़ुष्यात घडणाऱ्या गोष्टींमुळे चांगलीच चर्चेत असते. आता ही श्वेताने तिचा पती अभिनव कोहली याच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे. अभिनव हा श्वेताचा दूसरा नवरा असून त्याच्या कडून तिला मारहाण करण्यात आली आहे. श्वेतासह अभिनवने तिची मुलगी पलक हिला देखील मारहाण केली. या प्रकारानंतर श्वेता आणि तिची मुलगी पलक या दोघींनी पोलिस ठाण्यात धाव घेतली असून कांदिवलीच्या समता नगर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

दारुच्या नशेत अनेकदा श्वेता आणि मुलगी पलकला मारहाण करायचा, असे श्वेताने तक्रारीत म्हटले आहे. चार तासांच्या चौकशीनंतर पोलिसांनी अभिनवला अटक केली. मुलगी पलक हिला मोबाइलवर अश्लील फोटो दाखवून तिला शिवीगाळ देखील करायचा असेही यावेळी श्वेताने पोलिसांना सांगितले.

View this post on Instagram

🦋The purest Love ❤️

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari) on

एशियन एजने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी श्वेताचा पती अभिनयविरोधात आयपीसीच्या कलम ३५४ ए (लैंगिक छळ), कलम ३२३(जाणीवपूर्वक नुकसान पोहोचवणे), कलम ५०४ (जाणीवपूर्वक अपमान करते), कलम ५०६ (धमकावणे) आणि कलम ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

View this post on Instagram

London ❤️

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari) on