अभिनेत्री श्वेता तिवारी हिने तिचा पती अभिनव कोहली याच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे. या सर्व प्रकारात आता पलक तिवारीने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची बाजू मांडली आहे.
अभिनेत्री श्वेता तिवारी हिने तिचा पती अभिनव कोहली याच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे. अभिनव हा श्वेताचा दुसरा नवरा असून त्याच्या कडून तिला मारहाण करण्यात आली आहे. श्वेतासह अभिनवने तिची मुलगी पलक हिला देखील मारहाण केली. या प्रकारानंतर श्वेता आणि तिची मुलगी पलक या दोघींनी पोलीस ठाण्यात धाव घेत कांदिवलीच्या समता नगर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या सर्व प्रकारात आता वेगळे वळण आले आहे. पलक तिवारीने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची बाजू या विषयावर मांडली आहे.
पलक तिवारीने तिच्या इंटाग्रामवर या प्रकरणी भाष्य केले आहे. पलकने या प्रकरणी ज्या ज्या लोकांनी त्यांना सपोर्ट केले आहे, त्यांचे आभार मानले आहेत. तसेच या प्रकरणी तिने काही स्पष्टीकरण करताना म्हटले आहे की, मी पलक तिवारी, कित्येकदा मी घरगुती हिंसाचाराची शिकार बनले आहे. माझ्या आई तो दिवस सोडल्यास ज्या दिवशी तक्रार दाखल केली होती. त्या व्यतिरिक्त कधीही माझ्या आईला मारले नाही. पलकने तिचे सावत्र वडिल अभिनव कोहली यांच्याबाबत नमूद केले आहे की, त्यांनी कधीही माझा लैंगिक झळ केलेला नाही. मात्र ते नेहमीच अपशब्दांचा मारा करत होते. ज्याबाबत फक्त माझ्या आईला आणि मलाच माहिती आहे. कोणत्याही महिलेसाठी असे शब्द ऐकणे त्रासदायक ठरू शकते. तसेच मला माझ्या आईचा अभिमान आहे, असे सांगायलाही पलक विसरली नाही.