घरमनोरंजनमराठमोळ्या रितेशचा नवा हिंदी चित्रपट! 

मराठमोळ्या रितेशचा नवा हिंदी चित्रपट! 

Subscribe

रितेश देशमुख सध्या 'माऊली' आणि 'हाऊसफुल 4' या त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख सध्या त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. ज्यामध्ये ‘माऊली’ या मराठी तर ‘हाऊसफुल ४’ या हिंदी चित्रपटाचा समावेश आहे. अशातच आता रितेशच्या नव्या हिंदी चित्रपटाची घोषणा झाली आहे. सध्या हिंदी सिनेसृष्टीमध्ये याच चित्रपटाविषयी चर्चा रंगत आहेत. नुकत्याच रिलीज झालेल्या ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटाचा दिग्दर्शक मिलाप झवेरी रितेशच्या या आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटात रितेशसोबत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. रितेश देशमुख आणि सिद्धार्थ मल्होत्राने याआधीही सिल्व्हर स्क्रिनवर एकत्र काम केले आहे. ‘एक व्हिलन’ या चित्रपटातून झळकलेली ही जोडी आता पुन्हा एकदा या नव्या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. दरम्यान रितेशच्या या नवीन चित्रपटाचं नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.


वाचा : रितेशच्या मुलाचं स्टार किड्सना चॅलेंज

उपलब्ध माहितीनुसार रितेश आणि सिद्धार्थचा हा आगामी चित्रपट एक अॅक्शनपट असेल. निखिल अडवाणी या चित्रपटाची निर्मती करणार असल्याचं समजतंय. या बातमीनंतर रितेश देशमुख आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली असणार हे नक्की. दरम्यान ज्याप्रमाणे रितेश आपल्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे, त्याचप्रमाणे सिद्धार्थ मल्होत्राही सध्या त्याच्या ‘जबरिया जोडी’ या चित्रपटाचं शूटिंग करतो आहे.

पाहा : रितेशचा नव्या चित्रपटातील ‘माऊली’ अवतार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -