घरमनोरंजनसिद्धार्थ चांदेकरचा 'सिनेमा कट्टा' येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

सिद्धार्थ चांदेकरचा ‘सिनेमा कट्टा’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

सिद्धार्थ चांदेकरचा 'सिनेमा कट्टा' हा चॅट शो २० ऑक्टोबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मराठी सिनेनाट्यसृष्टीतला चॉकलेट बॉय सिध्दार्थ चांदेकर प्रेक्षकांसाठी एक खास एंटरटेनमेंट पॅकेज घेऊन येत आहे. कलाकारांच्या चित्रपट, नाटक, मालिका याविषयी जाणून घेण्यात अनेकांना रस असतो. पण या व्यतिरिक्त अजून काही जाणून घ्यायला मिळावं अशी इच्छा तर प्रेक्षकांची नक्कीच असते. प्रेक्षकांची अभिरुची लक्षात घेता शेमारु एंटरटेनमेंट लिमिटेड कंपनी खास प्रेक्षकांसाठी ‘सिनेमा कट्टा’ हा अनोखा चॅट शो घेऊन येत आहे. हा शो २० ऑक्टोबरपासून दर शनिवारी रात्री ८.३० वाजता आपलं मनोरंजन वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे.

सिद्धार्थचा पहिला चॅट शो

अभिनेता सिध्दार्थ चांदेकर शेमारु एंटरटेनमेंट लिमिटेड निर्मित ‘सिनेमा कट्टा’ या चॅट शो मध्ये निवेदकाची भूमिका साकारणार आहे. खरं तर सिध्दार्थचा हा पहिलाच चॅट शो आहे आणि यामुळे सिध्दार्थ देखील त्याच्या या नवीन कामाविषयी अतिशय उत्साही आहे. या चॅट शोच्या निमित्ताने समोरच्या व्यक्तीला बोलकं करण्याची सिध्दार्थची नटखट सवय प्रेक्षकांना पाहायला मिळेल आणि कलाकाराविषयी अधिक माहिती देखील जाणून घ्यायला मिळेल. या चॅट शोमध्ये आतापर्यंत अशोक सराफ, महेश मांजरेकर, महेश कोठारे, अलका कुबल, उषा नाडकर्णी या आणि अशा आणखी दिग्गज कलावंतांशी दिलखुलास गप्पा मारल्या आहेत आणि या गप्पांमधून त्यांचा फक्त या क्षेत्रातील प्रवासच नव्हे तर त्यांच्याविषयी आजवर फारशा माहीत नसलेल्या गोष्टीही लोकांना कळणार आहेत.

हेही वाचा – वो टॅलेंट ही क्या; जो किसी के काम ना आए!
या कारणामुळे किम शर्मा येणार बिग बॉसच्या घरात
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -