रणवीर-साराचं गाणं; ‘आँख मारे ओ लडकी…आँख मारे’!

'सिम्बा' चित्रपटातील नवकोरं गाणं 'आँख मारे ओ लडका...आँख मारे' रिलीज झालं असून अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री सारा अली खान थिरकताना दिसत आहे.

Mumbai
simmba
सिम्बा चित्रपटातील आँख मारे... गाणं

‘सिम्बा’ चित्रपटातील नवकोरं गाणं ‘आँख मारे ओ लडका…आँख मारे’ रिलीज झालं असून अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री सारा अली खान थिरकताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या समोर आला होता. त्यानंतर आज पहिलं वहिलं गाणं रिलीज झालं आहे. गाण्याच्या सुरुवातीलाच निर्माता करण जोहर दिसत असून त्याच्या शेवटाला गोलमाल सीरिजचे कलाकार अर्शद वारसी, श्रेयस तळपद, तुषार कपूर आणि कुणाल खेमूदेखील या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.

वाचा : Simmba trailer : रणवीरचा दमदार अंदाज

तेरे मेरे सपने चित्रपटातील मूळ गाणं 

१९९६ साली प्रदर्शित झालेल्या तेरे मेरे सपने चित्रपटातील हे मूळ गाणं आहे. अमिताभ बच्चन यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटातून चंद्रचूड सिंग, अर्शद वारसी, प्रिया गिल आणि सिमरन बग्गा या कलाकारांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. आँख मारे… हे गाणं अर्शद आणि सिमरनवर चित्रीत करण्यात आले होते. त्यामुळे याच्या रिमेक गाण्यातही शेवटी रोहित शेट्टीच्या गोलमाल सीरिजमधील कलाकार प्रामुख्याने अर्शद वारसी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे आजच्याच दिवशी म्हणजे ६ डिसेंबर १९९६ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तेच निमित्त साधून हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे.

aankh-maare-o-ladka-tere
तेरे मेरे सपनेमधील मूळ गाणं

वर्षाअखेरीस चित्रपट होणार प्रदर्शित

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ चित्रपटात सिद्धार्थ जाधव, विजय पाटकर, नंदू माधव, अरूण नलावडे, सौरभ गोखले यांच्यासह काही मराठी कलाकरांची फौज आहे. मराठमोळ्या पोलिसाची भूमिका साकारणाऱ्या रणवीर सिंहसोबत इतके मराठी कलाकार आहेत म्हटल्यावर भट्टी चांगली जमून येणार हे नक्की. ‘सिम्बा’ चित्रपट तेलुगू चित्रपट ‘टेंपर’चा रीमेक आहे. या चित्रपटात रणवीर सिंग एक मराठी पोलीस अधिकारी म्हणजेच संग्राम भालेरावच्या भूमिकेत दिसणार आहे. तर त्याच्या जोडीला सैफ अली खानची मुलगी सारा अली खान आहे. सिम्बाच्या निमित्ताने रणवीर सिंह आणि रोहित शेट्टी हेसुद्धा प्रथमच एकत्र काम करत आहेत. या चित्रपटात अनिल कपूर आणि अजय देवगण हे दोघे कॅमिओ रोल करताना दिसणार आहे. येत्या २८ डिसेंबरला हा चित्रपट थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे.

वाचा : सिंबामध्ये दिसणार हे मराठी कलाकार!