घरमनोरंजनSimmba trailer : रणवीरचा दमदार अंदाज

Simmba trailer : रणवीरचा दमदार अंदाज

Subscribe

पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणाऱ्या रणवीर सिंहचा दमदार आणि रावडी अंदाज, 'सिम्बा'चा युएसपी आहे असंच म्हणावं लागेल.

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असेलल्या ‘सिम्बा’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. सध्या युट्यूब आणि सोशल मीडियावर ‘सिम्बा’च्याच ट्रेलरचा बोलबाला आहे. काही तासांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘सिम्बा’चा ट्रेलर सध्या तूफान व्हायरल होतो आहे. चित्रपटात रणवीर सिंग आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत असून, ट्रेलरमध्ये या दोघांची केमिस्ट्री भाव खाऊन जाते आहे. सारा आणि रणवीर सिम्बाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करत असून, चित्रपटात दोघांचं एक रोमॅंटिक गाणं पाहायला मिळत आहे. ट्रेलर पाहतेवेळी रणवीर सिंगचा मराठमोळा लूक आणि त्यांचे मराठीमधले संवाद आपलं लक्ष वेधून घेतात. बाजीराव मस्तानी चित्रपटानंतर आता ‘सिम्बा’मधली रणवीरचा हा मराठमोळा अवतार, प्रेक्षकांची मनं जिंकून घेणार यात काहीच शंका नाही. ट्रेलरमध्ये आपल्याला रणवीरची धमाकेदार अॅक्शन पाहायला मिळते. पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणाऱ्या रणवीरचा दमदार आणि रावडी अंदाज ट्रेलरचा युएसपी आहे असंच म्हणावं लागेल. टसिम्बा’चा ट्रेलर पाहताना, सिंघम चित्रपटाची आठवण होते. ट्रेलरच्या सुरुवातीला सिंघम चित्रपटातील थोडासा भागही दाखवण्यात आला आहे. त्यामुळे ‘सिम्बा’ चित्रपटाची कथा सिंघमशी निगडीत आहे हे नक्की.

मराठी कलाकारांची फौज…

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ चित्रपटांमध्ये सिद्धार्थ जाधव, विजय पाटकर, नंदू माधव, अरूण नलावडे, सौरभ गोखले यांच्यासह काही मराठी कलाकरांची फौज आहे. सिम्बाच्या ट्रेलरमध्येही त्याची झलक पाहायला मिळते. मराठमोळ्या पोलिसाची भूमिका साकारणाऱ्या रणवीर सिंहसोबत इतके मराठी कलाकार अाहेत म्हटल्यावर भट्टी चांगली जमून येणार हे नक्की.

- Advertisement -

‘सिम्बा’ चित्रपट तेलुगू चित्रपट ‘टेंपर’चा रीमेक आहे. या चित्रपटात रणवीर सिंग एक मराठी पोलीस अधिकारी म्हणजेच संग्राम भालेरावच्या भूमिकेत दिसणार आहे. तर त्याच्या जोडीला अाहे सैफ अली खानची मुलगी सारा अली खान. सिम्बाच्या निमित्ताने रणवीर सिंह आणि रोहित शेट्टी हेसुद्धा प्रथमच एकत्र काम करत आहेत. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटात अनिल कपूर आणि अजय देवगण हे दोघे कॅमिओ रोल करताना दिसणार आहे. येत्या २८ डिसेंबरला हा चित्रपट थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -