घरमनोरंजनअभिनेता, गायक अली झफरवर पुन्हा लैंगिक अत्याचाराचे आरोप

अभिनेता, गायक अली झफरवर पुन्हा लैंगिक अत्याचाराचे आरोप

Subscribe

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक, अभिनेता पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराच्या आरोपामध्ये अडकला आहे. मेकअप आर्टिस्ट लीना घानी हीने अलीवर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले असून तिने याबाबत तक्रार दाखल केली आहे. लीना घानी हीने यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. यात तिने म्हटले आहे की, अनेक वर्षांपासून अली झफर माझ्यावर लैंगिक अत्याचार करत आहे. त्यामुळे आता मी माझ्यासाठी लढायचं ठरवलं आहे. त्यांनी मला कोर्टात जायला सांगिलतं आहे. त्यामुळे आता मी कोर्टातच त्यांच्याविरोधात लढणार आहे. लीनाने सिंध उच्च न्यायालयात खटला दाखल करत अलीविरोधात 50 कोटींची नुकसान भरपाई मागितली आहे. यापूर्वीही अली झफरवर पाकिस्तानी गायिकेने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते.

- Advertisement -

अली झफरने बॉलिवूडमधील अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. बॉलिवूडमधील तेरे बिन लादेन, लंडन पॅरिस, मेरे ब्रदर की दुल्हन, डिअर झिंदगी यांसारख्या चित्रपटांमध्ये तो झळकला होता. तसेच अनेक बॉलिवूड चित्रपटांना त्याने संगीत दिले आहे.दरम्यान, अली झफर बॉलिवूडमधील बऱ्याच चित्रपटात काम केलं आहे. त्याने तेरे बिन लादेन, लंडन पॅरिस, मेरे ब्रदर की दुल्हन, डिअर झिंदगी या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. अलीने बॉलिवूडमधील चित्रपटांमध्ये गायन देखील केले आहे.


हेही वाचा – हिंदूंच्या भावना दुखवल्यामुळे ‘तांडव’ वेबसीरिज बंद करण्याची मागणी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -