Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन उर्मिलानंतर आता आशा भोसले यांचे इंन्स्टाग्राम अकाउंट हॅक

उर्मिलानंतर आता आशा भोसले यांचे इंन्स्टाग्राम अकाउंट हॅक

सोशल मीडियावरही आशा भोसले यांचे लाखात फॉलोवर्स होते. अकाउंट हॅक झाल्याने काही मिनिटातच त्यांच्या इंन्स्टाग्रामवरून त्यांच्या सगळ्या पोस्ट गायब झाल्या.

Related Story

- Advertisement -

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे इंन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाले आहे. आशा भोसले यांनी ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. इंन्स्टाग्राम अकाउंट हॅक होण्याआधी त्यांना कॉपी राईट्स संदर्भात एक नोटीफिकेशन आले होते. त्यानंतर आशा भोसले यांचे इंन्स्टाग्राम अकाउंट हॅक करण्यात आले. काही गडबड असल्याचे कळताच आशा भोसले यांनी त्वरित त्यांच्या टेक्निकल टिमशी संपर्क साधला. आशा भोसले यांचे जगभरात लाखो चाहते आहेत. त्यांचे अनेक फॉलोवर्स आहेत. सोशल मीडियावरही आशा भोसले यांचे लाखात फॉलोवर्स होते. अकाउंट हॅक झाल्याने काही मिनिटातच त्यांच्या इंन्स्टाग्रामवरून त्यांच्या सगळ्या पोस्ट गायब झाल्या.

आशा भोसले यांनी स्वत: ट्विटरवरून त्यांच्या चाहत्यांना ही बातमी दिली. आधी मला कॉपी राईट संदर्भात नोटीफिकेशन आले. त्यानंतर माझे इंन्स्टाग्राम अकाउंट हॅक करण्यात आले असे त्या म्हणल्या. अकाउंट हॅक झाल्यानंतरचा त्यांनी काढलेले स्क्रिन शॉट्सही ट्विटरवर शेअर केले आहेत. जर तुमच्याही प्रोफाइलवर असे नोटिफिकेशन आले तर त्याला काही उत्तर देऊ नका. कृपया या कडे दुर्लक्ष करा. आम्ही लवकरच माझे अकाउंट पुन्हा कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहोत, असे आशा भोसले यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

काही दिलसांपूर्वी अभिनेता स्वप्नील जोशीचेही इंन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाले होते. त्यावेळीही स्वप्नीलने त्याच्या चाहत्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला होता. त्याचप्रमाणे अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांचेही इंन्स्टाग्राम अकाउंट हॅक करण्यात आले होते. मुंबई पोलिसांच्या मदतीने त्यांचे अकाउंट पुन्हा रिस्टोर झाले. त्याबद्दल त्यांनी मुंबई पोलिसांचे आभारही मानले होते. सोशल मीडियावरील अकाउंड हॅक होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यात सेलिब्रेटी तसेच जास्त फॉलोवर्स असलेल्या युझर्सचा समावेश आहे. त्यामुळे सोशल मीडियावर असलेले अकाउंट योग्यरित्या वापरा, योग्य काळजी घ्या असे पोलिसांकडून वारंवार सांगण्यात येत आहे.


- Advertisement -

हेही वाचा – दीपिका पहिल्यांदाच दिसणार ‘खलनायिके’च्या भूमिकेत

 

- Advertisement -