घरमनोरंजनलवकरच स्मिता झळकणार वेब सिरीजमध्ये

लवकरच स्मिता झळकणार वेब सिरीजमध्ये

Subscribe

मराठी, हिंदी चित्रपटांत अभिनयाची छाप पाडल्यानंतर अभिनेत्री स्मिता तांबे लवकरच वेब सिरीजमध्ये पदार्पण करत आहे.

मराठी, हिंदी चित्रपटात आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारी अभिनेत्री स्मिता तांबे लवकरच एका वेब सिरीजमध्ये दिसणार आहे. ‘हवा बदल हासू’ असे या वेब सीरिजचे नाव आहे. या वेब सिरीजमध्ये स्मिता आरतीची भूमिका साकारत आहे. पेट्रोल पंपावर काम करत असलेली आरती पर्यावरण शास्त्रात पीएचडी करत असते. या वेब सिरीज विषयी सांगताना स्मिता म्हणाली की, आरती हासूने (एक व्यक्तिरेखा) हाती घेतलेल्या पर्यावरण पूरक मोहिमेत त्याची महत्त्वाची सहकारी बनते. ती हासूकडून रोज प्रवाशांच्या बाबतीत कधीही न ऐकलेल्या गोष्टी ऐकत असते. त्यानुसार त्याच्या वायुप्रदूषण रोखण्याच्या लढ्याचा अप्रत्यक्षरीत्या भाग बनते.

मराठी प्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीतही अभिनेत्री स्मिता तांबेने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. जोगवा, ७२ माइल्स, परतू, देऊळ, यासारख्या विविध मराठी चित्रपटात भूमिका साकरल्यावर स्मिताने आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवला. सिंघम रिटर्न्स, रुख सारख्या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. सावट चित्रपटाच्या माध्यमातून तिने निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकले. लवकरच ती कंगणाच्या पंगा चित्रपटात दिसणार असून, सेक्रेड गेम्स-२ मध्ये स्मिता अभिनय करणार आहे. हवा बदल हसू च्या माध्यमातून स्मिता डिजिटल माध्यमातही अभिनयाची छाप पाडेल यात तिळमात्र शंका नाही.

- Advertisement -

हवा बदल हासू विषयी…

ही एक विज्ञान -पर्यावरणपूरक आधारित थ्रिलर वेब सिरीज आहे. सामान्य माणसाच्या जीवनापासून सुरुवात होणारी ही सिरीज पुढे जाऊन वैज्ञानिक कथेत रूपांतरित होते. सप्तराज सिवा दिग्दर्शित या वेब सीरिजच्या निर्मिती आणि सहाय्यक लेखकाची धुरा प्रतिक मुजुमदारने सांभाळली आहे. लवकरच सोनी लाईव्ह वर ही वेब सिरीज प्रदर्शित होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -