टिकटॉक स्टार प्रतीक खत्रीचा भीषण कार अपघातात मृत्यू

social media influencer and tiktok star prateek khatri death in a car accident
टिकटॉक स्टार प्रतीक खत्रीचा भीषण कार अपघातात मृत्यू

सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आणि टिकटॉक प्रतीक खत्री याचा कार अपघातात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मंगळवारी रात्री प्रतीक खत्रीचा एका भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. त्याच्या अचानक एक्झिटमुळे सर्वांच धक्का बसला आहे.

माहितीनुसार, प्रतीक खत्री मंगळवारी रात्री उशीरा देहरादून मेडिकल कॉलजेमध्ये जाण्यासाठी बागपत येथून निघाला होता. जेव्हा प्रतीक साखन कला गावाजवळ पोहोचला तेव्हा अचानक समोरुन येणाऱ्या एका ट्रकने त्याच्या कारला जोरदार धडक दिली. प्रतीकचा जागीच मृत्यू झाला. प्रतीकच्या अशा अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

दरम्यान प्रतीक खत्रीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याचे इन्स्टाग्रामवर ४५ हजारपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. प्रतीकच्या निधनानंतर अनेकांनी टिकटॉक स्टारने दुःख व्यक्त केले आहे. अभिनेत्री आणि टिकटॉक स्टार आशिया भाटिया हिने देखील इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करून दुःख व्यक्त केले आहे. तिला प्रतीकचा मृत्यू झाला आहे, यावर विश्वास बसत नसल्याच्या भावना तिने व्यक्त केल्या आहेत.

View this post on Instagram

How are you all..? #reels #feelit

A post shared by Prateek Khatri (@prateekkhatrii) on

प्रतीकने दोन दिवसांपूर्वी हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. तसेच या व्हिडिओवर लाईक्सचा वर्षाव होत आहे. त्याच्या मृत्यूनंतर सध्या त्याचे फॉलोअर्स वाढताना दिसत आहेत.


हेही वाचा – शेवंता पुन्हा येतेय प्रेक्षकांना करायला क्लीन बोल्ड