घरमनोरंजनडॅनी डेंजोग्पाच्या मुलाचा बॉलिवूडमध्ये डेब्यू

डॅनी डेंजोग्पाच्या मुलाचा बॉलिवूडमध्ये डेब्यू

Subscribe

बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक डॅनी डेंजोग्पाचा मुलगा रिंजिंग डेंजोग्पा 'स्क्वाड' चित्रपटामार्फत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक डॅनी डेंजोग्पाचा मुलगा रिंजिंग डेंजोग्पा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. रिंजिंग ‘स्क्वाड’ या एक्शन चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटात रिंजिंग सोबत मालविका राज, तनिषा ढिल्लन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मालविकाने याअगोदर शाहरुख खानच्या ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात तिने करीना कपूरने केलेल्या ‘पू’ या पात्राचे बालपण साकारले होते. दरम्यान, ‘स्क्वाड’ चित्रपटाचे दिग्दर्शन निलेश सहाय यांनी केले आहे. रविवारी ‘स्क्वाड’ स्टार कास्टने बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमची भेट घेतली. जॉनने अनेक चित्रपटांमध्ये अॅक्शन हिरोची भूमिका साकारली आहे. त्यामुळे त्याने फिटनेससाठी विविध प्रकारचे टिप्स दिले. ‘स्क्वाड’ चित्रपटाची संपूर्ण टीम चित्रीकरणासाठी बुधवारी बेलारूसला रवाना होणार आहे. तिथे चित्रपटाचे पहिले नियोजित चित्रीकरण होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ज्युनिअर शहारूख पदार्पणासाठी सज्ज; वडिलांसह करणार डेब्यू

‘स्क्वाड’ चित्रपटात नेमके काय असणार?

रिंजिंगचा ‘स्क्वाड’ चित्रपट पूर्णपणे अॅक्शनवर आधारित असणार आहे. या चित्रपचात रोमॅन्सही दाखवला जाणार आहे. या चित्रपटाचे संपूर्ण अॅक्श स्टंट कीर बेक याने डिझाईन केले आहेत. बेकने याअगोदर ‘मॅडमॅक्स’मध्ये काम केले आहे. रिंजिंगचा हा पहिला चित्रपट कसा असेल? याकडे संपूर्ण चित्रपटसृष्टीसह डॅनी डेन्जोंगपाच्या चाहत्यांचा नजरा लागलेल्या आहेत.

- Advertisement -

डॅनीने आपल्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत विविध चित्रपटांमध्ये काम केले आहे. कलाकाराला भाषेचे बंधन नसते, हे वाक्य डॅनीसाठी अगदी समर्पक असे आहे. डॅनीने हिंदीसह नेपाळी, तमिळ, तेलगू आणि बंगाली भाषेतील चित्रपटांमध्येही काम केले आहे. डॅनीच्या यशस्वी कारकिर्दीनंतर आता त्याचा मुलगा रिंजिंग देखील बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमवत आहे.

son of Danny Danjogpa debuts in bollywood
डॅनी डेंजोग्पाच्या मुलाचा बॉलिवूडमध्ये डेब्यू
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -