Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी सोनाक्षी सिन्हाने चालवली मुंबईच्या रस्त्यावर बुलेट; नेटीझन्सनी मात्र केले ट्रोल

सोनाक्षी सिन्हाने चालवली मुंबईच्या रस्त्यावर बुलेट; नेटीझन्सनी मात्र केले ट्रोल

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मुंबईच्या वर्दळीच्या रस्त्यावर बुलेट चालवल्यामुळे चागंलीच ट्रोल झाली आहे. मात्र मुंबईच्या रस्त्यावर बुलेट चालवण्याबद्दल सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रीया दिल्या आहेत.

Related Story

- Advertisement -

सध्या अनेकजण सोशल मीडियावर या ना त्या कारणांवरून नकळत ट्रोल होतात. यामध्ये कलाकार म्हटलं की नेटकऱ्यांना भानच राहत नाही. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मुंबईच्या वर्दळीच्या रस्त्यावर बुलेट चालवल्यामुळे चागंलीच ट्रोल झाली आहे. सोनाक्षी सिन्हा बुलेटवर करीना कपूरच्या सेटवर जात असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरतोय. या  व्हिडिओमध्ये सोनाक्षी रहदारीच्या रस्त्यावर बुलेट चालवताना दिसत आहे. तर एक अंगरक्षकही सोनाक्षीपासून थोड्या अंतरावर तिच्यासोबत धावताना दिसतोय.

नेटकऱ्यांनी दिल्या संमिश्र प्रतिक्रीया 

मात्र मुंबईच्या रस्त्यावर बुलेट चालवण्याबद्दल सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रीया दिल्या आहेत. काहींनी तिचे कौतुक केले आहे, तर अनेकांनी तिच्यावर कॅमेरामन आणि इतर प्रवाशांच्या सुरक्षिततेशी तडजोड केल्याबद्दल टीकाही केली आहे. इन्स्टाग्रामवर चाहत्यांनी सोनाक्षीला “दबंग गर्ल” आणि “बुलेट राणी” असे म्हटले, तर एकाने “तू एक प्रेरणा आहेस” अशीही प्रतिक्रीया दिली आहे. अशाप्रकारे सोनाक्षी सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली आहे. एकाने तर हा विनोद आहे का? असा सवालच केलाय. तसेच हे लोकांना त्रास देणारे आहे आणि तिला रहदारीच्या रस्त्यांवर बुलेट शिकता येणार नाही असेही काहीजण म्हणत आहेत.

- Advertisement -

तसेच सोनाक्षी सिन्हा बऱ्याच दिवसांनी अभिनेता अजय देवगणसोबत एक आगामी चित्रपट ‘भुज:प्राइड ऑफ इंडिया’ मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट १४ ऑगस्ट २०२० ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

- Advertisement -