अभिनेत्री सोनाली बेंद्रे सेटवर परतली

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे सेटवर परतणार असल्याची सोनालीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

Mumbai
sonali bendre returns on set for shooting after getting cancer treatment; share instagram post
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे गेल्या ६ महिन्यापासून न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत होती. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला ती आपल्या मायदेशी परतली. कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर आता ती पुन्हा एकदा कामावर परतली असून आता सोनाली लाइट्स, कॅमेऱ्यासमोर उभी राहण्यासाठी सोनाली सज्ज झाली आहे. सोनालीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत तिच्या चाहत्यांना आपण सेटवर परतल्याचे सांगितले आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर केली पोस्ट

सोनालीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करीत सांगितले आहे की, ‘गेले काही महिने आराम केल्यानंतर मी आता परत आले आहे. विविध पातळ्यांवर विविध प्रकारे मी परीक्षा दिली आहे. तसेच हा एक विचित्र अनुभव होता. पण कामावर परतण्याचा आनंद काही वेगळा आहे. तसेच हा क्षण शब्दांत मांडता येणार नाही. कॅमेऱ्याला पुन्हा एकदा सामोरं जाणं आणि भावभावना पुन्हा जिवंत करणं एक सुंदर अनुभव आहे,’ असे सोनालीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

सहा महिने होती न्यूयॉर्कमध्ये

जुलै महिन्यात अभिनेत्री सोनाली बेंद्रेला हाय- ग्रेड कॅन्सरचं निदान झालं होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी ती न्यूयॉर्कला गेली. गेल्या सहा महिन्यापासून तिच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना देखील सोनाली नेहमी सोशल मीडियावर एक्टिव असायची. सतत तिचे अनुभव ती सोशल मीडियावर शेअर करायची. काही दिवसांपूर्वीच तीने मी भारतात लवकरच परतणार अशी पोस्ट केली होती. सोनाली न्यूयॉर्कमध्ये असताना अक्षय कुमार, सुझान खान, प्रियांका चोप्रा, नितू सिंग, अनुपम खेर यांनी तिची भेट घेऊन तिच्या तब्येतीची विचारपूस करत तिला धीर देखील दिला होता. तिची यशस्वी झुंज अनेकांसाठी प्रेरणादायी असून ती चाहत्यांना ऑनस्क्रीय कोणत्या शोच्या माध्यमातून भेटणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.


वाचा – सोनाली बेंद्रे उपचारानंतर मायदेशी परतली


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here