घरमनोरंजनसोनाली बेंद्रे उपचारानंतर मायदेशी परतली

सोनाली बेंद्रे उपचारानंतर मायदेशी परतली

Subscribe

अखेर सोनाली काल रात्री कॅन्सरवरील उपचार पूर्ण करुन भारतात परतली. सोनाली आता पूर्णपणे बरी झाली असून फक्त तिला नियमित तपासणी करवाी लागणा आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे गेल्या ६ महिन्यापासून न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत होती. सोनाली मायदेशी परतणार अशा चर्चा सुरु होत्या. अखेर सोनाली काल रात्री कॅन्सरवरील उपचार पूर्ण करुन भारतात परतली. ज्यावेळी सोनाली एअरपोर्टवर पोहचली तेव्हा मीडियाच्या कॅमेराला पाहून भावूक झाली. सतत ती सर्वांना हात जोडून नमस्कार करत होती. तसंच तिने तिच्या चाहत्यांना धन्यवाद देखील म्हटलं. मला माझ्या चाहत्यांनी ऐवढे प्रेम दिले की, मी त्यांचे आभार शब्दात व्यक्त करु शकत नाही.

- Advertisement -

सहा महिने होती न्यूयॉर्कमध्ये

जुलै महिन्यात अभिनेत्री सोनाली बेंद्रेला हाय- ग्रेड कॅन्सरचं निदान झालं होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी ती न्यूयॉर्कला गेली. गेल्या सहा महिन्यापासून तिच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना देखील सोनाली नेहमी सोशल मीडियावर एक्टिव असायची. सतत तिचे अनुभव ती सोशल मीडियावर शेअर करायची. काही दिवसांपूर्वीच तीने मी भारतात लवकरच परतणार अशी पोस्ट केली होती. सोनाली न्यूयॉर्कमध्ये असताना अक्षय कुमार, सुझान खान, प्रियांका चोप्रा, नितू सिंग, अनुपम खेर यांनी तिची भेट घेऊन तिच्या तब्येतीची विचारपूस करत तिला धीर दिला होता.

सोनाली पूर्णपणे बरी झाली

सोनाली बेंद्रेचा नवरा गोल्डी बहल यांनी सांगितले की, सर्वांचे खूप खूप आभार. जवळपास ६ महिने झाले आहे. मी सर्वांना सागू इच्छितो की, सोनाली आता पूर्णपणे ठीक झाली आहे. तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मी सोनालीच्या सर्व चाहत्यांचे आभार व्यक्त करतो. ज्यांच्या प्रेम, प्रार्थना आणि पाठिंब्यामुळे ती बरी झाली आहे. यावेळई सोनालीचे सर्व उपचार पूर्ण झाले आहेत. सोनाली आता पूर्णपणे बरी झाली आहे. आता फक्त आम्हाला नियमित तपासणसाठी करावी लागेल. कारण हा असा आजार आहे की तो पुन्हा उद्भवू शकतो. सोनाली आता पूर्णपणे बरी झाल्यामुळे आता आम्हाला तपासणीसाठी परत जावे लागणार नाही. फक्त नियमित तपासणी करावी लागेल. सोनाली खूप खंबीर महिला आहे. आम्ही सर्व आणि तुम्ही सर्व तिच्या सोबत आहोत.

- Advertisement -

इंस्टाग्रामवर शेअर केली होती पोस्ट

दरम्यान, डॉक्टरांनी सोनालीला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. मध्ये मध्ये तिला स्कॅन आणि नियमित तपासणी करावी लागेल. मुंबईला येण्यापूर्वी सोनालीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मी मुंबईला परतणार असल्याची माहिती दिली होती. या पोस्टमध्ये तिने असे सांगितले आहे की, आपल्यावरील उपचारांचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून आता आपल्याला मायदेशात जाण्यास डॉक्टरांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे मी खूप खुश आहे. तसेच आपल्या घरापासून दूर राहताना तिची मानसिक स्थिती कशी झाली याबद्दल देखील तिने लिहीले होते. मात्र या अंतराने मला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. मात्र आता मी माझ्या मायदेशी येणार असल्याने मला खूप आनंद होत असून मी हा आनंद शब्दात मांडू शकत नसल्याचे सोनालीने सांगितले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -