घरमनोरंजनतुमच्याकडे खूप तक्रारी असतील तरी ही मतदान करा - सोनाली कुलकर्णी

तुमच्याकडे खूप तक्रारी असतील तरी ही मतदान करा – सोनाली कुलकर्णी

Subscribe

सोनालीचा हा स्वत:हून समाजकार्यात होणारा सहभाग तिच्या चाहत्यांच्या पसंतीस पडला असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

आज लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रातील जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर यांसारख्या १४ राज्यात हे मतदान होत आहे. याच मतदानाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणते, ‘तुमच्याकडे खूप तक्रारी असतील तरिही मतदान करा हे आपले कर्तव्य आहे’, असे सांगत अनेक मतदारांना देखील मतदान करून आपला हक्क बजाविण्याचे आवाहन केले आहे.

 

View this post on Instagram

 

Happy voting Maharashtra ? #LokSabhaElections2019 #लोकसभानिवडणूक #Phase3 #VotingRound3 #VoteKar

A post shared by Sonali Kulkarni (@sonalikul) on

- Advertisement -

मतदारांना केले आवाहन

सगळीकडे मतदानाची रणधुमाळी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. या राजकीय वातावरणात टीव्ही, चित्रपट, सोशलमीडिया सारख्या माध्यमातून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करण्याचा प्रयत्न सर्वतोपरी होताना दिसत आहे. यामध्ये कलाकारदेखील मोठया उत्साहाने सहभागी झाले असल्याचे पाहायला मिळत आहे.

समाजकार्यातील सहभाग

प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने देखील नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. सोनालीने आपल्या या व्हिडीओच्या माध्यमातून नागिरकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मतदान करणे हे प्रत्येक नागरिकांची जबाबदारी असल्याचे देखील तिने यावेळी व्हिडीओद्वारे सांगितले. सोनालीचा हा स्वत:हून समाजकार्यात होणारा सहभाग तिच्या चाहत्यांच्या पसंतीस पडला असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. सोनालीने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवत आली आहे. तिने बॉलिवूडच नव्हे तर मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने वेगळे स्थान निर्माण केले आहे.

- Advertisement -

इतर कलाकारांनी ही केले मतदान

‘देशाबद्दल प्रेम आहे आणि नागरिक म्हणून ह्या देशाचा, भारताचा विकास होण्यासाठी काय करू शकतो? हा प्रश्न मनात असेल, तर जाऊन मतदान करा.’ असे आवाहन करत अभिनेता सुयश टिळकने देखील मतदानाचा हक्क बजावला.

तर अभिनेत्री, गायक म्हणून लाडकी असणारी आर्या आंबेकर हीने मतदान करण्याची विनंती करत मतदारांना तुम्ही मतदान केले का? असा प्रश्न विचार स्वत:ही मतदानाचा अधिकार बजावला.

 

View this post on Instagram

 

Did you? #plsvote #bearesponsiblecitizen

A post shared by Aarya Ambekar (@ambekaraarya) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -