घरCORONA UPDATEपुन्हा तो धावून आला...केरळमध्ये अडकलेल्या १७७ मुलींना सोनूने सुखरूप पोहचवलं घरी!

पुन्हा तो धावून आला…केरळमध्ये अडकलेल्या १७७ मुलींना सोनूने सुखरूप पोहचवलं घरी!

Subscribe

‘लॉकाडाऊनमुळे या सर्व मुली केरळमध्ये अडकल्या होत्या.

कोरोना विषाणू रोखण्यासाठी लॉकडाऊनचा ४ था टप्पा देशात सुरू आहे. परंतु या लॉकडाउनमुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत अनेक सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला आहे. मात्र यामध्ये सर्वाधिक चर्चा होतेय ती अभिनेता सोनू सूदची. बॉलिवूडच्या या अभिनेत्याकडे लोकं ट्विटरच्या माध्यमातून मदत मागत आहेत आणि तो त्याला प्रतिसाद देत आहे. आतापर्यंत सोनू सूदने हजारो प्रवासी मजुरांना आपल्या घरी पोहोचण्यास मदत केली आहे.आता पुन्हा एकदा त्याने केरळमध्ये अडकलेल्या १७७ मुलींना त्यांच्या घरी सुखरुपरित्या पोहोचवलं आहे.

या सर्व मुली एर्नाकुलममधील एका फॅक्ट्रीमध्ये शिवणकाम आणि भरतकाम-विणकामांच काम करतात. या अडकलेल्या मुलींची माहिती भूवनेश्वरमध्ये राहणाऱ्या एका मित्राने सोनूला दिली. त्यानंतर सोनूने यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. सोनूने सरकारकडून भुवनेश्वर आणि  कोची  विमानतळ काही वेळासाठी सुरु करण्याची परवानगी घेतली. बंगळुरुवरुन एक स्पेशल एअरक्राफ्ट मागवून या मुलींना भुवनेश्वरला त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवलं. या मुलींना कोची येथून जाण्यासाठी बंगळूरहून विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली.

- Advertisement -

‘लॉकाडाऊनमुळे या सर्व मुली केरळमध्ये अडकल्या होत्या, पण आता लवकरच त्या भुवनेश्वरला त्यांच्या घरी सुखरूप पोहोचतील. माझ्यासाठी यापेक्षा जास्त आनंद दुसरा कोणताही असू शकत नाही’, अशी प्रतिक्रिया सोनूने दिली.

पडद्यावरचा हा खलनायक खऱ्या आयुष्यात रिअर हिरो झाला आहे. त्यामुळे सध्या सोनू सूद सोशल मीडियावर जास्त चर्चेत आहे. सेलिब्रिटीनसह सरकारने देखील सोनू सूदचे कौतुक केले आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – ही बॉलिवूड अभिनेत्री मराठी चित्रपटाच्या रिमेकमध्ये साकारतेय मुख्य भुमिका!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -