स्थलांतरित मजुरांच्या मदतीसाठी पुढे आला सोनू सूद

बॉलिवूड स्टार सोनू सूद स्थलांतरित मजुरांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी मदत करत आहे.

Mumbai
sonu sood

कोरोना विषाणूचा कहर थांबायचं नाव घेत नाही आहे. कोरोना वॉरियर्स कोरोनाशी झुंज देत असताना, बॉलिवूड स्टार्ससुद्धा लोकांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. अभिनेता सोनू सूद देखील मदत करत आहेत. बरेच कामगार घर पायी चालत जात आहेत. अशा परिस्थितीत सोनू सूदने बर्‍याच लोकांना त्यांच्या घरी घेऊन जाण्याचं वचन दिलं आहे.

बिहारमधील एका व्यक्तीने ट्विट केलं आहे की त्यांनी जवळच्या पोलिस चौकीच्या अनेक फेऱ्या मारल्या. आता ते धारावी येथे राहतात. पण मदतीची आशा नाही. त्या व्यक्तीच्या ट्विटवर सोनूने त्याला आपला तपशील पाठवण्यास सांगितलं आहे. सोनूने लिहिलं, “भाऊ चक्कर मारणं थांबव. दोन दिवसांत बिहारमधील आपल्या घरी पाणी पिणार तु, तपशील पाठव.”

दुसर्‍या व्यक्तीने ट्विट करून सोनूची मदत घेतली. त्यांनी लिहिलं, “सर, कृपया आम्हाला पूर्व युपी मध्ये कोठेही पाठवा, तिथून तुम्ही सर गावाला चालत जाऊ.” सोनूने लिहिलं, “तूपायी जाशील का मित्रा? नंबर पाठव.”

दररोज ४५ हजार लोकांना जेवण

सोनूने यापूर्वी बिहारच्या अनेक मजुरांना त्यांच्या घरी पाठवलं. ट्विटरद्वारे त्यांच्याशी संपर्क साधणाऱ्या सर्वांची सोनू मदत करत आहेत. वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी मुंबईतील जुहूमधील हॉटेलचे दरवाजेही उघडले. याआधी जेव्हा देशात लॉकडाऊन सुरु झालं, तेव्हा त्याने वडील शक्ती सागर सूद यांच्या नावे एक योजना सुरू केली, ज्या अंतर्गत तो दररोज ४५ हजार लोकांना जेवण देत होता.


हेही वाचा – हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा वापर आता ‘हे’ लोक देखील करु शकतात


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here