घरताज्या घडामोडीVideo : सोनू सूद म्हणतो 'पुन्हा नक्की परत या...'

Video : सोनू सूद म्हणतो ‘पुन्हा नक्की परत या…’

Subscribe

सोनू सूद मजुरांना म्हणतो 'पुन्हा नक्की परत या...'

देशात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वच जण लढत आहेत. मात्र, तरीही कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात अद्याप यश काही आलेले नाही. त्यामुळे राज्या राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि लॉकडाऊन यामुळे मजुरांचे प्रचंड हाल झाले आहेत. दरम्यान, मजुरांना त्यांच्या घरी सोडण्याकरता महाराष्ट्र सरकारकडून विशेष परवानगी घेऊन अभिनेता सोनू सूद त्यांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी व्यवस्था करत आहे. त्यामुळे सोनू सूद काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आला आहे. दरम्यान, सोनू सूदचा आणखी एक किस्सा आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. उत्तर भारतीय मजुरांना घरी पाठवताना त्यांची चौकशी करत ‘पुन्हा परत येणार का?, असा प्रश्न सोनू त्यांना विचारतो.

मजुरांशी काय साधला संवाद

अभिनेता सोनू सुद गेल्या कित्येक दिवसांपासून विविध मार्गाने मजुरांची मदत करत आहे. अनेकांना जेवण पुरविण्यासोबतच त्यांनी गावी पायी चालत जाणाऱ्यांसाठी बसची सोय केली आहे. सोनूने महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारकडून रितसर परवानगी घेऊन मजुरांना त्यांच्या गावी पोहचविण्याची व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे खुद्द सोनू प्रत्येक मजुराला निरोप देण्यासाठी जात आहे. दरम्यान, स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार; आज देखील सकाळी सोनू सूद मजुरांना बसमध्ये बसवण्यासाठी बस स्थानकाजवळ गेला होता. त्यावेळी सोनू सूदने बसमधील मजुरांशी संवाद साधला.

- Advertisement -

सुरूवातीला त्याने मजुरांची चौकशी केली. नंतर त्या बसमध्ये बसलेल्या सर्वांना मास्क लावण्यास सांगितले. तसेच बसमध्ये पिण्याचे पाणी आणि खाण्याची सोय केली असल्याचे सांगत निरोप दिला. यावेळी त्याने सर्व काही ठिक झाल्यानंतर पुन्हा येणार ना? असा प्रश्नही विचारला. त्यानंतर स्वत: सोनू सूद ‘पुन्हा नक्की परत या…’, असे देखील त्यांना सांगत आहे.

- Advertisement -

दरम्यान, देशात लॉकडाउनची घोषणा झाल्यापासून सोनू सतत विविध मार्गाने मजुरांची मदत करत आहे. त्याने आतापर्यंत अनेक मजुरांच्या जेवणाची सोय केली आहे. तसेच त्याचे काही हॉटेल्स देखील डॉक्टर, नर्स यांच्यासाठी खुले केले आहेत.


हेही वाचा – Video: वडिलांच्या आठवणीने अजय देवगण भावूक; शेअर केली पोस्ट


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -