घरमनोरंजनअरे देवा! ट्रेलरऐवजी अपलोड केला संपूर्ण सिनेमा

अरे देवा! ट्रेलरऐवजी अपलोड केला संपूर्ण सिनेमा

Subscribe

करायचं होतं काय आणि झालं काय... काहीसा असा प्रकार घडला सोनी पिक्चर्ससोबत. ट्रेलरऐवजी त्यांनी चक्क अपलोड केला संपूर्ण सिनेमाच.

सिनेमा रिलीज होण्यापूर्वी चाहत्यांना उत्सुकता असते ती सिनेमाच्या ट्रेलरची. ट्रेलर हा त्या सिनेमाची थोडक्यात पण नेमकी झलक तुम्हाला देत असतो. समजा तुम्ही एखाद्या सिनेमाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होता, तो ट्रेलर युट्यूबवर अपलोडही झाला पण प्रत्यक्ष पाहिल्यावर तुम्हाला कळलं की तो ट्रेलर नसून संपूर्ण सिनेमाच आहे. नेमका असाच प्रकार घडला सोनी पिक्चर्स या कंपनीसोबत. करायचं होतं काय आणि झालं काय… काहीसा असा प्रकार सोनी पिक्चर्ससोबत घडला. ट्रेलर अपलोड करण्याऐवजी त्यांनी अख्खा चित्रपटच युटयूबवर अपलोड केला.

८ तास मोफत सिनेमा

सोनी कंपनीला त्यांच्या  ‘खली द किलर’ या आगामी सिनेमाचा ट्रेलर युट्यूबवर अपलोड करायचा होता. मात्र चुकून त्यांच्याकडून १ मिनीट ४० सेकंदाच्या ट्रेलरऐवजी ९० मिनिटांचा संपूर्ण सिनेमाच अपलोड झाला. आश्चर्याची बाब म्हणजे सिनेमा अपलोड होऊन तब्बल ८ तास उलटले तरीही कुणालाच याची खबर लागली नाही. अखेर सीबीआर डॉट कॉम या मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या वेबसाईटने याची कल्पना सोनी पिक्चर्सना दिली. ही खबर मिळताच सोनी पिक्चर्सच्या अधिकाऱ्यांनी त्वरित सिनेमा युट्यूबवरुन हटवला आणि त्याजागी सिनेमाचा ट्रेलर अपलोड केला. दरम्यान ८ तासांच्या कालावधीत बऱ्याच सिनेरसिकांनी युट्यूबवर सिनेमाचा मोफत आस्वाद घेतला. एक छोटीशी चूकही किती महागात पडू शकते याचं हे उदाहरण म्हणता येईल. ‘खली द किलर’ हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच लिक झाला असला तरी या घोळामुळे सिनेमाला जगभरात प्रसिद्धी मिळाली असणार हे नक्की.

- Advertisement -

पाहा ‘खली द किलर’चा ट्रेलर:

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -