घरमनोरंजन'राझी'चे 100 कोटींच्या दिशेने उड्डाण!

‘राझी’चे 100 कोटींच्या दिशेने उड्डाण!

Subscribe

बॉक्स ऑफिसवर गाजत असलेला आलिया भट स्टारर ‘राझी’ १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणार का?याकडे आता सर्वांचे डोळे लागले आहेत. आत्तापर्यंत ‘राझी’ने ८२.०३ कोटींची कमाई केली आहे.त्यामुळे लवकरच राझी १०० कोटींचा आकडा पार करेल अशी शक्यता चित्रपट समीक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.दिवसेंदिवस चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद वाढतोय. शुक्रवारी ‘राझी’ने ४.७५ कोटी, तर शनिवारी ७.५४ कोटींचा गल्ला जमावला.

काय आहे कथानक?

- Advertisement -

‘राझी’ हा चित्रपट १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे.आलिया भट्टने यात गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. आलिया पाकिस्तानी सैनिकासोबत लग्न करते. पाकिस्तानात जाते आणि तिथून भारतासाठी माहिती गोळा करण्याचे काम करते. यामध्ये पाक सैनिकाची भूमिका विकी कौशलने साकारली आहे. एका धाडसी तरुणीची भूमिका आलियाने यात साकारली आहे.आलियाच्या अभिनयाचे देखील सर्वत्र कौतुक होत आहे.तर, आलियाचा हा आत्तापर्यंतच उत्तम अभिनय असल्याचे वडील महेश भट यांनी म्हटलंय.

चित्रपट समीक्षकांची चित्रपटाला पसंती

- Advertisement -

बॉलिवूडमधल्या अनेकांनी चित्रपटाला पसंती दर्शवली आहे. पहिल्याच आठवड्यात राझीने ५६.५९ कोटींचा गल्ला जमवला. देशासह परदेशात मिळून चित्रपटाने आत्तापर्यंत ९० कोटींची कमाई केली आहे. जंगली पिक्चर्स आणि धर्मा प्रोडक्शनची निर्मीती असलेल्या या चित्रपटाचे संगीत कवी गुलजार यांनी केले आहे. आलिया भट आणि विकी कौशल ही जोडी देखील प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहे. मराठमोळी अमृता खानविलकर देखील या चित्रपटात आहे. कथानकासह कास्टींगला देखील प्रेक्षक पसंती देत आहेत. इतर चित्रपटांच्या रिलीजनंतर देखील राझीची बॉक्सऑफिसवरची घोडदौड कायम आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -