थलायवाच्या लेकीचं आज लग्न!

दाक्षिणात्य सुपरस्टार थलायवा रजनीकांत याची मुलगी सौंदर्या हिचा आज विवाहसोहळा चेन्नईमधील दि लीला पॅलेस या हॉटेलमध्ये संपन्न होत आहे.

Mumbai
Soundarya
रजनीकांतची मुलगी सौंदर्या

दाक्षिणात्य सुपरस्टार थलायवा रजनीकांत याची मुलगी सौंदर्या हिचा आज, सोमवारी विवाहसोहळा चेन्नईमधील दि लीला पॅलेस या हॉटेलमध्ये संपन्न होत आहे. सौंदर्या ही विशहन यासोबत विवाहबद्ध होणार आहे. रजनीकांत या ठिकाणी आपल्या कुटुंबासोबत पोहोचला असून इतरही पाहुणे मंडळी येथे येत आहेत. काही दिवसांपूर्वी सौंदर्या आणि अभिनेता विशगन वनंगमुडी यांचा प्री-वेडींग रिसेप्शन सोहळा चेन्नईमध्ये पार पडला होता. सौंदर्याचे हे दुसरे लग्न असून यापूर्वी तिने अश्विन रामकुमारसोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र काही काळानंतर ते दोघ विभक्त झाले. सौंदर्या ही सुपरस्टार रजनीकांत यांची दुसरी कन्या असून त्यांची पहिली कन्या ऐश्वर्या ही अभिनेत धनुष याची पत्नी आहे.

वाचा – बर्थडे विशेष: जेजुरीचा खंडोबा ‘रजनीकांत’चे कुलदैवत

सौंदर्याला पाच वर्षाचा मुलगा

सौंदर्याचे पहिले लग्न एका मासिकाचे संपादक अश्विन रामकुमार याच्याशी २०१० मध्ये झाले होते. लग्नाच्या काही वर्षांनंतर हे दोघे विभक्त झाले होते. सौंदर्याला पाच वर्षाचा मुलगा आहे. मागीलवर्षी सौंदर्याला घटस्फोट झाला. रजनीकांत यांनी मुलीचे लग्न वाचवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सौंदर्याचा घटस्फोट झाला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here