दाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवी यांना कोरोनाची लागण

दाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवी यांना कोरोनाची लागण

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार चिरंजीवी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. याबाबत चिरंजीवी यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. तसेच गेल्या ५ दिवसांत त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोना चाचणी करण्याची विनंती केली आहे.

चिरंजीवींनी ट्विटमध्ये सांगितले आहे की, ‘आगामी ‘आचार्य’ चित्रपटापूर्वी नियमांनुसार कोरोना चाचणी केली. या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पण कोणतीही लक्षणे दिसत नसून ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या ते स्वतः घरीच क्वारंटाईन झाले आहेत.’

 

चिरंजीवीच्या या ट्विटनंतर सध्या सोशल मीडियावर #Chiranjeevi ट्रेंड करत आहे. चाहते लवकरच त्यांना बरे वाटावे म्हणून प्रार्थना करत आहेत. तसेच चिरंजीवी यांना काळजी घेण्यास सांगत आहे.

काही दिवसांपूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची चिरंजीवी आणि नागार्जुन यांनी भेट घेतली होती. या भेटीचा सोशल मीडियावर फोटो चांगलाचं व्हायरल झाला होता. लवकरच चिरंजीवी ‘आचार्य’ चित्रपटानंतर ‘चिरू १५२’ चित्रपटात काम करताना दिसणार आहेत. चित्रपटाचा पहिला मोशन पोस्टर जारी झाला आहे.


हेही वाचा – बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालच्या घरी NCB चा छापा, ड्रायव्हरला ताब्यात