‘स्पेशल ५’ मध्ये गौरीचा डॅशिंग अंदाज

गुन्हेगारी संपवायला ‘स्पेशल ५’ ची टीम सज्ज झाली आहे. १० डिसेंबरपासून स्टार प्रवाहवर स्पेशल ५ ची टीम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Mumbai
gouri kiran
गौरी किरण

आपल्या आजूबाजूला असंख्य गुन्हे घडत असतात. अगदी प्रत्यक्षपणे नाही तर अप्रत्यक्षपणे त्या घटनांचा परिणाम आपल्यावर होत असतो. त्यामुळे नकळतच एक भितीच सावट आपल्यावर येत. एखादा पेपरात वाचलेला गुन्हा कधी आपल्याबरोबरही घडू शकतो, हा विचारच आपल्याला त्रासदायक ठरतो. पण आता घाबरण्याची गरज नाही कारण ही गुन्हेगारी संपवायला ‘स्पेशल ५’ ची टीम सज्ज झाली आहे. ‘स्पेशल ५’ची टीम तुमची भिती नक्कीच कमी करेल यात शंकाच नाही. या मालिकेचे प्रोमो सध्या सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहेत. येत्या १० डिसेंबरपासून स्टार प्रवाहवर स्पेशल ५ ची टीम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या मालिकेत तुमच्यासाठी खास सरप्राईझ आहे. पुष्पक विमान या चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री गौरी किरण या मालिकेत सब इन्सपेक्टर विद्या शिंदेच्या भुमिकेत दिसणार आहे. नुकताच गौरीचा प्रमो प्रेक्षकांसमोर आलाय. या प्रमोत गौरीचा डॅशिंग अंदाज प्रेक्षकांना आवडत आहे.

SPECIAL 5

नवीन क्राईम शो १० डिसेंबर पासून Star प्रवाह वर.'स्पेशल पाच' #StarPravah #Special5 #10Dec #930pm Gouri Kiran

Posted by STAR Pravah on Wednesday, 28 November 2018

देशाची सेवा करण्याचे टीमचे ध्येय

सदरक्षणाय खलनिग्रहणाय असं म्हणत देशाची सेवा करण्याचा या टीमने जणू वसाच घेतला आहे. या मालिकेत अजय पुरकर इन्स्पेक्टर यशवंत इनामदार ही व्यक्तीरेखा साकारत आहे.  तर सब इन्सपेक्टर अर्जुन भोसलेच्या भुमिकेत अभिनेता समीर विजयन दिसेल. अशी तगडी स्टार कास्ट या मालिकेत आहे. मात्र अजून उर्वरीत दोघे कोण आहेत हे गुलदस्त्यात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here