घरमनोरंजनमालिकांमध्ये रविवारी रंगणार विशेष भाग

मालिकांमध्ये रविवारी रंगणार विशेष भाग

Subscribe

सोमवार ते शनिवार आपलं मनोरंजन करणाऱ्या मालिका रविवारी नसल्या की महिला वर्गांना अगदी चुकल्या चुकल्या सारखं होतं. त्यामुळे रविवारीची संध्याकाळही उत्साहात घालवण्यासाठी कलर्स मराठी आणि झी मराठीवर मालिकांचे महाएपिसोड होणार आहेत.

रविवार विशेष भाग

- Advertisement -

आपल्या धकाधकीच्या जीवनात एक तास विरंगुळ्याचे क्षण देणारा कार्यक्रम म्हणजे ‘झिंग झिंग झिंगाट’. याच गाण्यांच्या जुगलबंदीमध्ये रविवारी आपल्याला भेटणार आहेत झी मराठी वाहिनीवरील आपले लाडके कलाकार. येत्या रविवारी झिंग झिंग झिंगाट या मालिकेचा २ तासांचा विशेष भाग प्रसारित होणार असून या भागात माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील अभिजित खांडकेकर, अनिता दाते, अद्वैत दादरकर, सुहिता थत्ते, कांचन गुप्ते, तुला पाहते रे या मालिकेतील अभिज्ञा भावे, मोहिनीराज गटणे, प्रथमेश देशपांडे, विद्या करंजीकर, शर्वरी पाटणकर आणि चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, तुषार देवल, स्नेहल शिदम हे कलाकार सहभागी होणार आहे.

Ghadge-Sunn
मालिकेना गाठला ५०० भागांचा पल्ला

 

- Advertisement -

तर कलर्स मराठीवरील ‘घाडगे अण्ड सून’ आणि ‘सुखांच्या सरींनी हे मनबावरे’ या मालिकांचे विशेष भाग रंगणार आहेत. सध्या घाडगे अण्ड सून मालिकेमध्ये कियारा आणि भाग्यश्री यां दोघींचे डोहाळजेवणाचा कार्यक्रम रंगणार आहे. सध्या मालिकेत कियारा प्रेग्नट नाहीये याच सत्य अमृता आणि अक्षयला समजले आहे. या दोघांबरोबरच अमृताच्या काकांना कियाराच सत्य समजलं आहे. काका अक्षयला यावरून ब्लॅकमेल करत आहेत. आता डोहाळजेवणाच्या दिवशी घाडगे कुटूंबावर आणखी काही संकट येणार का हे तुम्हाला रविवारच्या भागात बघायला मिळणार आहे.

तर ‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’ मध्ये अनु सिध्दार्थला खास सरप्राईझ देणार आहे. सध्या मालिकेत अनु आणि सिध्दार्थची मैत्री तुटावी यासाठी सिध्दार्थची आई आणि काकू प्रयत्न करत आहेत. काकू प्रत्येक महिन्याला अनुकडून दहा हजार रूपये घेते ते आता सिध्दार्थला समजलं आहे. यावरून सिध्दार्थ आणि काकूमध्ये वाद होतात. पैशासाठी अनु सिध्दार्थची मैत्री तोडत नाही. त्यामुळे आता येणाऱ्या रविवारी अनु-सिध्दार्थला काय सरप्राईझ देणार हे कळायला तुम्हाला येत्या रविवारचा भाग बघावा लागणार आहे.

 ‘तर नवरा असावा असा’ यामध्ये कागर चित्रपटाची टीम उपस्थित राहणार आहे. कात रिंकू आणि शुभंकरने कागर चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे अनेक धम्माल किस्से सांगितले आहेत. तेव्हा येत्या रविवारचा नवरा असावा असा अजिबात चुकवू नका.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -