घरमनोरंजनस्टाईलीश शाहीद कपूर

स्टाईलीश शाहीद कपूर

Subscribe

चित्रपटाचे प्रमोशन आणि वैयक्तिकपणे स्वीकारलेले कार्यक्रम या दोन गोष्टी अभिनेता शाहीद कपूर याने वेगवेगळ्या ठेवलेल्या आहेत. ‘कबीर सिंग’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने तो भरभरून बोलत असला तरी त्याच्यासाठी ते व्यासपीठ प्रमोशनासाठी असते. ‘मार्क्स् अ‍ॅण्ड स्पिन्सर’ या लंडनच्या स्टाईलिस्ट कपड्यांची निर्मिती करणार्‍या उद्योग कंपनीसाठी सध्या तो भारतातला ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर आहे. २०१९ साठी या कंपनीने माणसाच्या जीवनशैलीप्रमाणे स्टाईलिस्ट कपड्यांची निर्मिती केलेली आहे. मॉर्निंग वॉक ते घरी परतण्यापर्यंत स्त्री-पुरुषांच्या कामाची तर्‍हा ही वेगवेगळी राहिलेली आहे. ऑफिसमधील रोजच्या कामाचे कपडे, कर्मचार्‍याबरोबर असलेली बैठक ते अगदी कंपनीचा प्रतिनिधी म्हणून बड्या कंपनीशी होणार्‍या गाठीभेटी यासाठी जे रुबाबदार कपडे लागतात त्याची घोषणा मुंबईत करण्यात आली. पुरुषांचे व्यक्तीमत्त्व प्रभावी दिसावे यासाठी शाहीद कपूरने तर स्त्रियांचे व्यक्तीमत्त्व खुलून दिसण्यासाठी वाणी कपूर ही अभिनेत्री पुढे आली होती. या कंपनीचे भारतात एकाहत्तरहुन अधिक स्टॉल्स फॅशन शौकीनांसाठी थाटलेले आहेत म्हटल्यानंतर त्याला प्रतिसादही तेवढाच मिळतो आहे, हे लक्षात येते आहे.

केवळ प्रसिद्धी मिळते म्हणून उगाचच प्रसिद्धी माध्यमांच्या समोर येणे शाहीद कपूरला मान्य नाही. ग्रूपमध्ये नृत्य करत असताना तर ते अगदी नायक म्हणून आपले कर्तृत्त्व सिद्ध करेपर्यंत त्याने वेगवेगळ्या जबाबदार्‍या पार पाडलेल्या आहेत. फिल्मी अंकाच्या मुखपृष्ठावर दिसलो, जाहिराती केल्या पण फॅशन करून आपलं व्यक्तीमत्त्व दाखवण्याचा केलेला प्रयत्न भरपूरच आनंददायी आहे. तरुणवर्गात रोझ डे साजरा केला जात आहे. खरंतर भारतात माणूस थक्क होईल, असे कितीतरी उत्सव असताना आजच्या दिवसात रोझ डे ला महत्त्व द्यावे, असे वाटत नाही. मी ‘मार्क्स् अ‍ॅण्ड स्पिन्सर ’ या कंपनीचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर आहे त्यामुळे ‘कबीर सिंग’ या चित्रपटाविषयी इथे काही बोलावे असे वाटत नाही. भारतीय नागरिकांनी आपले व्यक्तीमत्त्व प्रभावी दिसण्यासाठी परदेशी कपड्यांचा आग्रह धरलेला आहे. ती काहीशी इच्छा या वर्षासाठी तयार करण्यात आलेल्या नव्या कपड्यांतून पूर्ण होईल, असे त्याने यावेळी सांगितले. स्टाईलीश शाहीदबरोबर प्रथमच तेही फॅशनच्या व्यासपीठावर एकत्र येता आले याचा आनंद वाणी कपूरने व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -