स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विटंबनेच्या घटनेला सुबोध भावेने केला निषेध

गुरुवारी काँग्रेसप्रणित विद्यार्थी संघटना एनएसयूआय कार्यकर्त्यांनी दिल्ली विद्यापिठातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला काळ फासून चपलेचा हार घातला. या घटनेबाबत सुबोध भावेने निषेध नोंदविला आहे.

Mumbai
subodh bhave reaction on nsui student leader mutilated savarkar statue at delhi university
अभिनेता सुबोध भावे

दिल्ली विद्यापिठातील आवारात ‘नॅशनल स्टूडंट्रस युनियन ऑफ इंडिया’च्या (एनएसयूआय) कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पुढाकाराने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हा पुतळा उभारण्यात आला होता. सर्व स्तरातून या घटनेला विरोधात संताप व्यक्त होत आहे. या घटनेचा अभिनेता सुबोध भावेने निषेध नोंदविला आहे. ‘स्वातंत्र्य लढ्यातील सर्वांबद्दल नितांत आदर माझ्या मनात आहे आणि या घटनेचा मी निषेध करतो.’ असं टि्वट केलं आहे. गुरुवारी दिल्ली प्रदेशाध्यक्ष अक्षय लकरा यांनी विनायक दामोदर सावरकरांच्या पुतळ्याला काळे फासून चपलीचा हार घातला.

याबाबत सुबोधने असं टि्वट केलं की,’स्वा.सावरकरांचे विचार पटायला हवेत किंवा नाही हा ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा विषय आहे,पण म्हणून त्यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालणं आणि त्याची विटंबना करणं हे निंदनीय आहे. स्वातंत्र्य लढ्यातील सर्वांबद्दल नितांत आदर माझ्या मनात आहे आणि या घटनेचा मी निषेध करतो.’

या घटने दरम्यान ‘भगतसिंग अमर रहे’ आणि ‘बोस अमर रहे’ अशी घोषणाबाजी काँग्रेसप्रणित विद्यार्थी संघटना एनएसयूआय कार्यकर्त्यांनी केली. याप्रकरणी एबीवीपीने कठोर कारवाईची मागणी केली आहे.


हेही वाचाएनएसयूआय कार्यकर्त्यांकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याची विटंबना


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here