घरमनोरंजनचक्क! सुबोध भावेच्या नावे संपूर्ण वृत्तपत्र!

चक्क! सुबोध भावेच्या नावे संपूर्ण वृत्तपत्र!

Subscribe

आपल्या दमदार अभिनयाने मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य जो अभिनेता अधिराज्य गाजवत आहे. तो अभिनेता म्हणजे सुबोध भावे. आज महाराष्ट्रात असा एकही प्रेक्षक नाही जो सुबोध भावेला ओळखत नाही. आजपर्यंत सुबोधने अनेक मराठी मालिका, चित्रपटात, नाटकात कामं केली आहेत. बालगंधर्व, आणि काशीनाथ घाणेकर, लोकमान्य टिळक या चित्रपटामुळे सुबोध स्वत:ची एक वेगळी जागा प्रेक्षकांच्या मनात निर्माण केली. त्याचप्रमाणे सुबोधची या वर्षी तूला पाहते रे ही मालिका प्रचंड गाजली.

- Advertisement -

 

सुबोध सोशलमिडीयावरही खूप अॅक्टीव्ह असतो. तो सोशलमिडीयाच्या माध्यमातून कायम चाहत्यांशी संवाद साधतो. सुबोध आपल्या अभिनयाच्या, नाटकात, मालिकेत अभिनय केल्याच्या बातम्या पेपरात छापून येणं हे काही नवीन नाही. पण चक्क आख्खा पेपरच सुबोधच्या बातम्यांनी भरून गेलाय.

View this post on Instagram

आनंद…..

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on

- Advertisement -

होय हे खरं आहे. पेपरात फक्त सुबोधच्या बातम्या आहेत. या पेपराचे फोटो सुबोधनेच सोशलमिडीयावर शेअर केले आहेत. या फोटोत केवळ सुबोध भावेचे गुणगान गायले आहे. या पेपरमध्ये सुबोध विषयी अनेक बातम्या छापून आल्या आहेत. शिवाय अनेक फॅन्स मुमेंट देखील आहेत. त्याचप्रमाणे त्या पेपरातील जाहीराती ही सुबोधच्या नावाच्या आहेत. बहुदा सुबोधच्या फॅन्सने त्याच्यासाठी हा पेपर बनवला आहे. या पेपराचं नाव आहे ‘सुबोधीयन टाईम्स’.

सध्या सुबोधचं अश्रृंची झाले फुले हे नाटक रंगभूमीवर गाजत आहे. त्याचप्रमाणे सुबोधचे अनेक चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. नुकतेच आप्पा आणि बाप्पा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -