घरमनोरंजनआसावरीची अशीही तयारी

आसावरीची अशीही तयारी

Subscribe

हिंदी कलर्स वाहिनीवर ‘इंटनेटवाला लव्ह’ ही मालिका दाखवली जाते. कोणत्या एका नव्या पात्राला यात शिरकाव करायचा झाला तर प्रथम प्रेक्षकांचा विचार करावा लागतो. कारण मालिकेला जी काही लोकप्रियता लाभलेली असते त्याचे सातत्य तर टिकवायचे असतेच पण मालिकेची उंचीसुद्धा कशी गाठली जाईल हे दिग्दर्शकाकडून पाहिले जाते. श्रीमंत, हसरी, खेळती तेवढीच चाणक्षवृत्तीची महिला या कथेत येणार आहे आणि ती भूमिका मराठीतल्या आसावरी जोशी यांच्यावर सोपवलेली आहे.

‘गोडी गुलाबी’, ’मुंबई-पुणे-मुंबई भाग-२,’ ‘वक्त,’ ’हम तुम और घोस्ट’, ‘शागिर्द’ अशा काही मोजक्याच मालिका, चित्रपटांतून काम आसावरी जोशी यांनी केलेले आहे. अनेक मालिकांमध्ये मोठ्या भूमिकेत दिसल्यानंतर चोखंदळपणा हा प्रत्येक कलाकाराचा वाढतो. ’इंटरनेटवाला लव्ह’ यात सुषमाची व्यक्तीरेखा आतापर्यंत साकार केलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी आहे म्हणताना आसावरी जोशी यांनी ही भूमिका स्वीकारलेली आहे. मैत्रीची अनेक कांगोरे या निमित्ताने दिसणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -