घरमनोरंजन'या' अभिनेत्यांचीही मराठीत एंट्री

‘या’ अभिनेत्यांचीही मराठीत एंट्री

Subscribe

बॉलीवूडच्या स्टार्सना मराठी सिनेमांनी भूरळ पाडली आहे. हे नवीन सांगण्याची गरज नाही. धकधक गर्ल माधुरीचा मराठीतला पहिला सिनेमा ‘बकेट लिस्ट’ रिलीज झाला. यानंतर आता आणखी एक बॉलिवूड अभिनेता मराठी सिनेमात येतोय. हा दुसरा-तिसरा कोणी नसून बॉलीवूडचा अण्णा म्हणजेच सुनील शेट्टी आहे. ‘अ ब क’  या मराठी सिनेमात त्याने काम केले असून हा सिनेमा येत्या ८ जूनला रिलीज होणार आहे. त्यामुळे अण्णाच्या फॅन्समध्ये उत्सुकता वाढली आहे.

ट्रेलरमध्ये दिसला अँग्री अण्णा

नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला. या सिनेमात अण्णा त्याच्या अँग्री अंदाजात दिसत आहे. बाप्पा ही भूमिका तो साकारतोय. गरीबीमुळे बालपण हरवलेल्या बहीण-भावाची ही गोष्ट असल्याचे ट्रेलरवरुन तरी कळत आहे. या सिनेमाचा ट्रेलर पाहून सिनेमाची स्टोरीलाईन रटाळ वाटत असली तरी सुनील शेट्टीच्या फॅन्ससाठी हा सिनेमा पर्वणीच असणार आहे.

- Advertisement -

ही अभिनेत्री देखील सिनेमात

अ ब क च्या ट्रेलरच्या मध्यावर आणखी एक अभिनेत्री दिसतेय. ती म्हणजे तमन्ना भाटिया. या सिनेमात ती कॅमिओ करतेय की, तिचा काही रोल आहे, हे अद्याप कळू शकले नाही.

tamanna bhatia
अभिनेत्री तमन्ना भाटिया

या बॉलीवूडकरांची ‘मराठी’वारी

मराठी सिनेमात या आधी रितेश देशमुख (लय भारी), नसिरुद्दीन शहा (न्यूड), तनुजा (पितृऋण), माधुरी दीक्षित-नेने (बकेट लिस्ट), सुमित राघवन( संदुक, आपला मानूस आणि बकेट लिस्ट) या सिनेमातून दिसले होते. याशिवाय सलमान खान, प्रियांका चोप्रा, रणबीर कपूर, ह्रतिक रोशन, अजय देवगण यांनी मराठी सिनेमात कॅमिओ केलेले आहेत.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -