बायको, मुलगा लोकसभा लढवतायत आणि धर्मेंद्र करतोय शेती

New Delhi
dharmendra farming video
एकेकाळचा बॉलिवूड सुपरस्टार धर्मेंद्र आता शेतीमध्ये रमला आहे

बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ या नावाने प्रसिद्ध असलेला अॅक्शन किंग धर्मेंद्र यांचे कुटुंब सध्या चांगलेच चर्चेत आहे. पत्नी हेमा मालिनी या दुसऱ्यांदा मथुरामधून लोकसभेची निवडणूक लढवत आहे, तर पुत्र सनी देओल हे पंजाबमधील गुरुदासपूर येथून निवडणूक लढवणार आहेत. धर्मेंद्र यांनी काही दिवसांपूर्वी हेमा मालिनी यांच्यासाठी प्रचार देखील केला होता. मात्र या सर्व व्यापातून धर्मेंद्र आपल्या शेतात वेळ घालवतानाही दिसत आहेत. सध्या ते इन्स्टाग्रामवर चांगलेच सक्रीय झाले असून शेतात काम करतानाचे अनेक व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्रामवर टाकले आहेत.

धर्मेंद्र यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते शेतात ट्रॅक्टर चालवताना दिसत आहेत. या व्हिडिओसोबत त्यांनी एक जबरदस्त कॅप्शनसुद्धा दिले आहे. “मजबुरीया ले जाती है दोस्तो… वरना इस जन्नत से जाने का जी नही होता.”
बघा हा व्हिडिओ

धर्मेंद्र यांनी चित्रपटसृष्टीला फार पुर्वी राम राम ठोकलेला आहे. हल्ली ‘यमला पगला दिवाना’ या चित्रपटाच्या तीन भागात त्यांनी आपल्या परिवारासोबत काम केलेले आहे. मात्र इतर चित्रपटांमध्ये ते दिसत नाहीत. सनी देओल आणि बॉबी देओल ही दोन्ही मुलं अधूनमधून चित्रपटांमध्ये काम करतात. सनी देओल आता राजकारणात उतरतोय तर बॉबी हा व्यवसायिक म्हणून स्थिरस्थावर झालेला आहे. धर्मेंद्र मात्र या वयात शेतीमध्ये समाधान मानत आहेत. नुकतेच त्यांच्या शेतातील एका झाडाला फळे लागल्यानंतर त्याचाही व्हिडिओ काढून त्यांनी आपल्या चाहत्यांना या झाडाची माहिती करुन दिली.

ट्रक्टर चालवण्यासोबतच धर्मेंद्र शेतामध्ये टोमॅटो आणि भाजीपाला पिकवतात त्याचेही व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. पाहा ते व्हिडिओ

 

आता शेती म्हटलं तर प्राणी आलेच. धर्मेंद्रच्या शेतामध्ये घोडा, तबेला आणि कुत्रा आहे. त्यांच्यासोबतही धर्मेंद्र वेळ घालवताना दिसतात.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here