अरेच्चा.. सनी लिओनीने मोदींना ‘यात’ टाकले मागे!

New Delhi
sunny leone continues as most googled celebrity in India
अरेच्चा.. सनी लिओनीने मोदींना 'यात' टाकले मागे!

सोशल मीडिया म्हटलं की, अनेक बॉलिवूड कलाकार हे खूप अॅक्टिव्ह असतात. कलाकार हे आपले फोटो, व्हिडिओ हे सतत शेअर करत असतात. यामुळे या कलाकारांचे फॅनफॉलोअरची संख्या जास्त होते. या सर्व गोष्टीमध्ये यावर्षी वरचढ ठरली आहे बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी. सनी लिओनी हिने भारतात गुगलच्या ‘मोस्ट सर्च्ड सेलिब्रिटी’च्या यादील अव्वल स्थान मिळवले आहे. सनीने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकप्रिय असे सुपरस्टार सलमान खान, शाहरूख खान, अक्षय कुमार यांना मागे टाकत तिने बाजी मारली आहे.

भारतात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्वाधिक गुगलवर सर्च झालेल्या व्यक्तिंच्या यादीत सनी लिओनी हिने बाजी मारली आहे. या यादीत तिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. २०१८ मध्ये देखील तिने गुगल सर्चमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता.

View this post on Instagram

😘

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

सनी लिओनीला सर्च करणाऱ्या राज्यांत मणिपूर आणि आसाममधील युजर्स आघाडीवर आहेत. ‘करणजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’ तिची बायोपिक सीरिज सर्वात जास्त सर्च केली गेली आहे. सनीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. ती अशी म्हणाली की, ‘माझ्या टीमने मला ही बातमी दिली. हे ऐकूण मला खूप आनंद झाला असून या सर्वाचे श्रेय माझ्या चाहत्यांचे आहे.’

View this post on Instagram

everyday mood 🌞😎

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

सध्या सनी लिओनी ही ‘रंगीला’ या मल्याळम चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. सनी पहिल्यांदाच मल्याळम चित्रपटात काम करताना दिसणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here