बॉलिवूड अभिनेत्याने मागितला सनीकडे मोबाइल नंबर; सनीने नंबर दिला पण…

ज्येष्ठ अभिनेत्याने नंबर मागितल्यानंतर सनी लिओनीने असे काही केले की कोणालाही आश्चर्य वाटेल. प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रत्नानी यांच्या कॅलेंडर लॉन्चवेळी घडली घटना.

Mumbai
sunny leone
त्याने मागितला सनीकडे मोबाइल नंबर, सनीने दिला पतीचा नंबर

प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानी यांनी नुकतेच २०२० मधील नवीन कॅलेंडर लाँच केले आहे. डब्बू रतनानी यांच्या कॅलेंडर लॉंचवेळी बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते. यावेळी डब्बूच्या कॅलेंडरमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो पाहायला मिळाले. डब्बू रतनानी यांच्या कॅलेंडर लाँचींगचं हे २१ वे वर्ष आहे. डब्बूच्या कॅलेंडर लाँचींगवेळी सनी लिओनी उपस्थित होती. यावेळी सनीकडे बॉलिवूड अभिनेत्याने मोबाइल नंबर मागितला.

डब्बू रतनानी यांच्या कॅलेंडर लॉंचवेळी बॉलिवूड अभिनेत्याने सनीकडे मोबाइल नंबर मागितला. त्यावर सनीने असे काही केले ज्यामुळे कोणालाही आश्चर्य वाटेल. डब्बू रतनानी यांच्या कॅलेंडर लॉंचवेळी ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी कबीर बेदी यांनी सनी लिओनीची भेट घेत तिच्याकडे मोबाइल नंबरबद्दल विचारणा केली. त्यावर सनीने असे काही केले ज्यामुळे कोणालाही हसायला देखील येईल आणि आश्चर्यही वाटेल. सनी लिओनीने ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी यांना आपला नंबर न देता तिने तिचा पती डॅनियल याचा मोबाइल नंबर दिला. कबीर बेदींनी नंबर मागितल्यानंतर सनी लिओनीचे हे पाऊल कोणालाही आश्चर्यचकित करेल. यावर्षी डब्बूच्या कॅलेंडरमध्ये सनी लिओनीने बोल्ड फोटोशुट केले आहे.

या वेळी डब्बू रतनानी कॅलेंडरमध्ये भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणी यांच्या बोल्ड फोटोंमुळे या दोघी चांगल्याच चर्चेत आहेत. या दोघींव्यतिरिक्त डब्बू रत्नानी यांच्या कॅलेंडरमध्ये विक्की कौशल, कृती सेनॉन, सनी लियॉनीसह बरेच कलाकार आहेत.

हे वाचा – सनी लिओनी न्यूड, विद्या बालन बाथसूटमधे आणि इतर टॉपलेस

सनी लियॉनीने नुकतच स्प्लिट्स व्हीला कार्यक्रमाचे निवेदन केले होते. सनी लियॉनीने २०१२ मध्ये पूजा भट्टच्या जिस्म २ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर ती अनेक खास गाण्यांमध्येही दिसली आहे. विशेषत: रईस या चित्रपटात तिच्या लैला गाण्याने मोठा धुमाकुळ घातला होता. आता लवकरच ती ‘कोकोकोला’ (Kokokola) या आगामी हॉरर कॉमेडी चित्रपटामध्ये दिसणार आहे. यासह ‘रंगीला’ आणि ‘वीरमादेवी’ हे तिचे आगामी चित्रपट आहेत.

हे देखील वाचा – भूमी पेडणेकर न्यूड फोटोमुळे पुन्हा एकदा चर्चेत

कबीर बेदी यांनी वयाच्या ७० व्या वर्षी केलं चौथं लग्न

ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी यांनी टीव्ही मालिका, सिनेमे आणि रेडीओ शोच्या जाहिरातींमध्ये कां केले आहे. याशिवाय ते यशस्वी वॉइस ओव्हर आर्टिस्टही आहेत. कबीर बेदी यांच्या सिनेकरिअरबद्दल बोलायचे झाले तर ते एक यशस्वी कलाकार आहेत. पण त्यांचे खासगी आयुष्य मात्र चढ-उतारांनी भरलेलं आहे. कबीर यांनी चार लग्न केली आणि त्यांची चौथी पत्नी त्यांच्याहून ३० वर्षांनी लहान आहे. जवळपास १० वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यावर कबीर यांनी २०१६ मध्ये वयाच्या ७० व्या वर्षी परवीनशी लग्न केलं. कबीर बेदी यांचे पहिले लग्न प्रोतिमा बेदी यांच्याशी झाले होते. प्रोतिमा या प्रख्यात ओडिशी डान्सर होत्या. १९६९ मध्ये त्यांच्या नात्याची सुरुवात झाली. पण त्यांचे हे नाते पार काळ टिकले नाही. अखेर १९७४ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. यानंतर कबीर यांचे नाव Susan Humphreys शी जोडले गेले. हे नातेही फार काळ टिकले नाही. यानंतर कबीर यांनी निक्की बेदीशी १९९२ मध्ये लग्न केले. हे लग्नही २००५ मध्ये तुटले. यानंतर कबीर हे परवीन दुसांजला डेट करायला लागले. कबीर बेदी यांनी वयाच्या ७० व्या वर्षी २०१६ मध्ये लग्न केले.