सनी लिओनीचा नागिन डान्स; पाहा व्हिडिओ

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने 'टिकटॉक'वर नागीन डान्स केला आहे. 'तेरी अखियों का यो काजल' या गाण्यावर तिने नागीन डान्स केला आहे.

Mumbai
Sunny leone nagin dance on tiktok
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने 'टिकटॉक'वर नागीन डान्स केला

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने ‘टिकटॉक’ या अॅपवर तयार केलेल्या व्हिडिओमध्ये नागिन डान्स केला आहे. ‘तेरी अखियों का यो काजल’ या प्रसिद्ध गाण्यावर तिने हा भन्नाट नागिन डान्स केला आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी बघितले आहे, शिवाय लाईक्सही केले आहेत. या व्हिडिओनंतर सनी लिओनी सपना चौधरीला टक्कर देत आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.

चर्चेत राहण्यासाठी सनीचे वेगवेगळे प्रयोग?

आतापर्यंत तुम्ही सनी लिओनीला बॉलिवूडच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये पाहिलं असेल. देशात सनी लिओनीचे लाखो तरुण फॅन आहेत. कलाकाराच्याही पलिकडे एक चांगली व्यक्ती म्हणून भारतीय चाहत्यांनी तिला हृदयात जागा दिली आहे. तिने अनाथ आश्रममधून एका चिमुकलीला दत्तक घेऊन सिद्ध देखील केलं आहे. सध्या ती काहीनाकाही कारणास्तव लोकांमध्ये चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिने आपल्या पतीसोबत डान्स केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिलोदेखील प्रचंड लाईक्स मिळाले होते. त्यानंतर तिने एका रेडिओ स्टेशनच्या येथे दिलेल्या मुलाखतीवेळी केलेल्या मजामस्तीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्या व्हिडिओलाही प्रचंड लाईक्स मिळाले होते. आता ती टिकटॉकवर बनवलेल्या व्हिडिओतील नागीन डान्समुळे चर्चेत आली आहे.

सपना चौधरीला टक्कर?

‘तेरी अखियों का यो काजल’ हे गाणं सपना चौधरी या हरियाणाच्या डान्सरमुळे जास्त प्रसिद्ध आहे. सपना चौधरी या गाण्यावर आपल्या शैलीत डान्स करुन प्रेषकांना घायाळ करते. याशिवाय ती चर्चेतदेखील राहते. त्यामुळे या हरियाणा डान्सरच्याच पायावर पाय देऊन सनी लिओनी चर्चेत राहणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here