घरमनोरंजनसनी लिओनीची घोड्यावरून तलवारबाजी

सनी लिओनीची घोड्यावरून तलवारबाजी

Subscribe

बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी लवकरच ’वीरमादेवी’ मध्ये दिसणार आहे. सनी या पोस्टरमध्ये घोड्यावर बसलेली दिसत आहे. सनीने पहिल्यांदाच एका राणी ची भूमिका साकारणार आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. सनी लियॉनीने आपल्या ट्विटर हँडलवर या सिनेमातील एक व्हिडिओ शेयर केला आहे. ‘तुमच्या सर्वांसोबत शेयर करताना मला उत्साह वाटत आहे’ असे सनीने लिहिले. याचित्रपटामुळे सनीला एक वेगळी ओळख मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

- Advertisement -

या चित्रपटाचे बजेट हे १०० कोटी असून वी.सी वदिवुदयान यांनी दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात स्पेशल इफेक्टवर भर दिला गेला असून त्यावर ४० कोटी रुपयांच बजेट खर्च केल्याचे सांगण्यात आले. सनी लिओनी ’वीरमादेवी’ सिनेमातून तामिळ सिनेमात डेब्यू करते. हा एक पीरियड ड्रामा असून याचा फर्स्ट लुक पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. ’वीरमादेवी’ सनी लिओनी एका योद्ध्याच्या रुपात दिसणार आहे. तामिळसोबतच हा सिनेमा कन्नड, मल्याळम, तेलुगू आणि हिंदीमध्येदेखील रिलीज करण्यात येणार आहे. सिनेमाच्या पोस्टरमध्ये सनी योद्धा असलेली पाहायला मिळत आहे. घोड्यावर बसलेली सनी युद्धाच्या मैदानात दिसते. सध्या या सिनेमाचे शूटिंग सुरू आहे. शूटिंग इन प्रोग्रेस असे या सिनेमाच्या पोस्टरमध्ये लिहिले आहे. या सिनेमासाठी ती तलवारबाजी शिकली आहे. साऊथ सिनेसृष्टीत काम करण्याची सनीची ही पहिलीच वेळ आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -