सनी लिओनने दिली मुलीला सुंदर भेट

Mumbai
sunny and nisha
सनी तिच्या मुलगी आणि नवऱ्यासोबत

अभिनेत्री सनी लिओन आणि डॅनियल वेबर यांनी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातल्या अनाथआश्रमातून एका मुलीला दत्तक घेतले. आता ती दोन वर्षांची झाली असून निशा असे तिचे नाव आहे. निशाच्या वाढदिवसाकरीता सनीने एक खास भेटवस्तू तयार केली आहे. क्रिस्टलजडीत एक कार्टून पेंटीग सनी निशाला भेट देणार आहे. या पेंटीगची खासियत म्हणजे ही पेंटीग सनीने स्वतः तयार केली आहे. सनीने बिग बॉस या रिअॅलिटी शोमधून करियरची सुरुवात केली. यानंतर जिस्म २ या सिनेमातून ती बॉलीवूडमध्ये आली. यानंतर सनी रागिणी एमएमएस २, मस्तीजादे अशा सिनेमातून काम करताना दिसून आली. सनीच्या जीवनावर आधारीत वेब-मालिकेत देखील ती स्वतः काम करत असून ‘करणजित कौर- द अन-टोल्ड स्टोरी’ असे या वेब-मालिकाचे नाव आहे.

sunny leone
अभिनेत्री सनी लिओन

पेंटीगसाठी लागले तब्बल सात महिने

सध्या सनी बऱ्याच नव्या प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. खासकरून स्प्लिट्सविला या कार्यक्रमाच्या वेळापत्रकातून वेळ काढत सनीने हे पेंटीग तयार केले आहे. त्यामुळे ऑक्टोबर २०१७ मध्ये तयार करायला घेतलेली ही पेंटीग काल रात्री १ वाजता पूर्ण झाली. तब्बल सात महिन्यानंतर तयार झालेल्या या पेंटीगचा एक व्हिडिओ सनीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर टाकला आहे.

सनी लिओनची स्वीट फॅमिली

सनी लिओन २०११ च्या सुरुवातीस डॅनियल वेबर सोबत लग्न बंधनात अडकली. यानंतर जुलै २०१७ मध्ये लातूरच्या अनाथआश्रमातून या दोघांनी एका मुलीला दत्तक घेतले. निशा कौर वेबर असे या मुलीचे नाव आहे. यानंतर ४ मार्च २०१८ रोजी सनीने आपल्याला दोन जुळी मुले झाल्याच जाहिर केले. त्यांची अशेर सिंग वेबर आणि नोहा सिंग वेबर अशी नावे आहेत. आपले आणि आपल्या फॅमिलीचे बरेच फोटो सनी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here