घरमनोरंजनरजनीकांत यांची मोठी घोषणा; लोकसभा निवडणूक लढवणार नाही

रजनीकांत यांची मोठी घोषणा; लोकसभा निवडणूक लढवणार नाही

Subscribe

सुपरस्टार रजनीकांत लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा त्यांनी केली आहे. तसंच येत्या लोकसभा निवडणुकीत ते इतर राजकीय पक्षांना समर्थन अथवा मदत करणार नाहीत.

सुपरस्टार रजनीकांत यांनी मोठी घोषणा केली आहे. रजनीकांत यांचा पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा त्यांनी केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही घोषणा केल्यामुळे रजनीकांत यांचे चाहते नाराज झाले आहेत. रजनीकांत यांनी एक पत्र जारी केले आहेत. त्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, मी आणि माझा पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार नाही. तसंच, त्यांच्या पक्षाचे लक्ष्य तामिळनाडू विधानसभा निवडणुकीकडे आहे.

- Advertisement -

इतर पक्षांना समर्थन करणार नाही

रजनीकांत यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी लिहेलेल्या पत्रात असे सुध्दा सांगितले आहे की, लोकसभा निवडणुकीत ते इतर राजकीय पक्षांना समर्थन अथवा मदत करणार नाही. त्यामुळे कोणीही आपल्या पक्षाचा झेंडा, आपला फोटो तसंच पशाचा लोगो आणि तपशील वापरु नये असे रजनीकांत यांनी सांगितले आहे.

चाहते नाराज 

रजनीकांत यांनी २०१८ मध्ये राजकारणात उडी घेत स्वत:चा पक्ष काढण्याचे ठरविले होते. त्यांनी त्यांच्या पक्षाची स्थापना केली. रजनीकांत यांनी पक्षाच्या स्थापना केल्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक त्यांचा पक्ष लढवणार अशी चर्चा सुरु होती. मात्र रजनीकांत यांनी लोकसभा निवडणुक लवढणुक लढवणार नसल्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांचे चाहते नाराज झाले आहेत.

- Advertisement -

तामिळनाडूच्या पाण्याचा प्रश्न महत्वाचा

अनेक मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करत रजनीकांत यांनी पत्र लिहीत त्यामध्ये असे म्हटले आहे की, पाणी प्रश्न हा तामिळनाडूसाठी मुख्य समस्या आहे. आगामी लोकसभा निवडणुकीचा उल्लेख करत त्यांनी जनतेला आवाहन केले आहे की, जो पक्ष त्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवेल त्याला मतदान करा असे सांगितले आहे. तामिळनाडूच्या पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पर्याप्त योजना आणणार आहेत.

हेही वाचा – 

नोटाबंदीची अंमलबजावणी चूक – रजनीकांत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -