घरमनोरंजन'सूर नवा ध्यास नवा'मध्ये बालदिन विशेष एपिसोड

‘सूर नवा ध्यास नवा’मध्ये बालदिन विशेष एपिसोड

Subscribe

'सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर' या कार्यक्रमामध्ये बालदिन साजरा करण्यात येणार आहे.

‘सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर’ या कार्यक्रमामधील लहान मुलांनी संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या सुरेल गाण्यांनी रसिक प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे. प्रत्येक आठवड्यात प्रेक्षक या कार्यक्रमाची अतुरतेने वाट बघत असतात. प्रत्येक आठवड्याला एखादं सरप्राईझ पॅकेज घेऊन हे छोटे सुरवीर आपल्यासमोर येतात. हा आठवडाही असाच खास असणार आहे. हा आठवडा बालदिन विशेषने रंगणार आहे. बालदिन विशेष भागामध्ये छोटे सुरवीर बराच दंगा घालणार आहेत. तसेच मुलांना एक सरप्राईझ देखील मिळणार आहे.

हेही वाचा – बालकलाकार असल्याचा अनुभव आता कामी येईल – स्पृहा जोशी

- Advertisement -

जादूचे प्रयोग रंगणार

जादूगार जितेंद्र रघुवीर हे मंचावर बरेच जादूचे खेळ दाखविणार आहेत. यावेळी जादूगार रघूवीर परिक्षक अवधूत गुप्ते आणि स्पृहाची फिरकी घेणार आहेत. यावेळी बच्चेकंपनी मात्र मस्त एन्जॉय करताना दिसणार आहे. आता हे जादूचे खेळ काय असणार? हे प्रेक्षकांना सोमवार आणि मंगळवारच्या भागात समजणार आहे.

मॉनेटरची धम्माल

सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमातील सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो तो वर्गाचा मॉनेटर हर्षद रायबळ. प्रत्य़ेक आठवड्यात हर्षद आपल्या त्याच्या कलाकारीने सगळ्यांची मनं जिकंतो. या आठवड्यातही हर्षद मुलांसोबत ‘छोटा बच्चा समजके हमको’ धम्माल गाणं सादर करणार आहे. त्याचबरोबर शरयू दाते आणि अजित परब सुंदर गाणं सादर करणार आहे. या विशेष भागांमध्ये चैतन्य देवडे मौला मौला, सृष्टी ये मेरा दिल, उत्कर्ष खेळ मांडला तर अंशिका ताल मधील गाणे सादर करणार आहे. तसेच या बालदिन विशेष मध्ये “Thank You” क्षण देखील मुलांसोबत मनवला जाणार आहे, ज्यामध्ये पालक आपल्या मुलांचे आभार मानणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – सुरू नवा ध्यास नवा मध्ये स्पृहा भरणार कवितांनी रंग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -