घरमनोरंजनकबड्डीचा न गवसलेला सूर

कबड्डीचा न गवसलेला सूर

Subscribe

मराठी चित्रपटसृष्टीतही अनेक खेळांवर आधारीत चित्रपट आले. त्यातले काही चित्रपट प्रेक्षकांनी उचलून धरले तर काही कथेच्या सुमार मांडणीमुळे प्रेक्षकांपर्यंत पोहचलेच नाहीत. याच पठडीत बसणारा अस्सल मातीतल्या खेळावर आधारीत चित्रपट म्हणजे सूर सपाटा.

आजवर अनेक खेळांवर आधारीत चित्रपट आले. एखाद्या खेळावर आधारीत चित्रपट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर ‘चक दे इंडिया’, ‘भाग मिल्खा भाग’ असे चित्रपट येतात. मराठी चित्रपटसृष्टीतही अनेक खेळांवर आधारीत चित्रपट आले. त्यातले काही चित्रपट प्रेक्षकांनी उचलून धरले तर काही कथेच्या सुमार मांडणीमुळे प्रेक्षकांपर्यंत पोहचलेच नाहीत. याच पठडीत बसणारा अस्सल मातीतल्या खेळावर आधारीत चित्रपट म्हणजे सूर सपाटा. अगदी गावागावातून ते आंतराष्ट्रीय स्तरापर्यंत हा खेळ खेळला जातो. ‘सूर सपाटा, मार रपाटा, याच गड्याचा काढीन काटा’ असं म्हणत या चित्रपटाची सुरूवात होते खरी. पण कब्बडी खेळतानच स्फूरण चित्रपट बघताना चढत नाही. सूरसपाटा बघताना कबड्डीचा सूर तुम्हाला लागतच नाही. अखेर चित्रपट बघून तुमची निराशाच होईल.

चिंचोली, काशीद या लहानश्या गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत नववीच्या वर्गात शिकणाऱ्या सात मुलांची ही गोष्ट. टग्या, दिग्या,इस्माईल, झंप्या,ज्ञाना,पूर्णा,परल्या या सात जीवलग मित्र. या सातही जाणांना आभ्यासा कंटाळा असतो पण ते कबड्डी खेळण्यात मात्र त्यांचा हात कोणीच पकडू शकत नाही. मात्र या टवाळखोर मुलांनी कबड्डीचा नाद सोडून अभ्यासाकडे लक्ष द्यावं आणि दहावीत शाळेचा निकाल शंभर टक्के लागावा अशी शाळेच्या डेडमास्तर साने यांना वाटतं असते. याचवेळी शाळेत आंतरशालेय राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा फॉर्म येतो. या सातही मुलांना या स्पर्धेत भाग घेऊन स्वत:ला सिध्द करायचं असंत. मात्र साने मास्तर मुलांना कबड्डी खेळायला नकार देतात. रंतु काही करुन स्पर्धेत उतरायचंच असं ठरवून हे सात जण मुख्याध्यापकांच्या खोलीतून स्पर्धेचा प्रवेश अर्ज चोरतात. स्वत:च शाळेचा स्टॅम्पवगैरे मारुन ठाण्याला आयोजन समितीकडे घेऊन जातात आणि स्पर्धेत सामील होतात. ही मुलं कबड्डी जिंकतात का? स्पर्धेत तगड्या आव्हानाला सामोरं जाताना मित्रांच्या मदतीला कोणी येतं का? स्पर्धेचा शेवट काय होतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला चित्रपट बघितल्यावरच समजणार आहेत.

- Advertisement -

कबड्डी सारख्या विषयावर चित्रपट असताना लेखक-दिग्दर्शकाला तो नीट मांडता आला नाहीये. चित्रपटाचा मुळ विषय हा मध्यंतरानंतर सुरू होतो. मध्यंतरा आधी पुर्ण चित्रपट ही सात मुलं कशी टवाळखोर आहेत, शाळेत किती मस्ती करतात त्यांच्या कबड्डी खेळायला पालक, शिक्षकांचा कसा विरोध असतो यावर चित्रपटाचा अर्धावेळ गेला आहे. त्यामुळे मुळ चित्रपटाचा विषय मागे राहतो. मुळ खेळ, खेळाचे नियम, खेळावरून होणारं राजकारण, हेवेदावे उभे करण्यात चित्रपट कमी पडला आहे. सात जाणांची टीम, त्यांना मिळालेलं प्रशिक्षण, स्पर्धा यावर भर दिला असता तर चित्रपटाला नक्कीच चांगला सूर गवसला असता.

चित्रपटात कलाकारांची कामं उत्तम झाली आहेत. उपेंद्र लिमये, संजय जाधव,प्रवीण तरडे यांनी आपली कामं चोख बजावली आहेत. चित्रपटात मुख्य भुमिकेत असणाऱ्या त्या सात मुलांनी आपल्यापरीने कामं उत्तम निभावण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटातील गीत,संगीत यांचा फारसा प्रभाव प्रेक्षकांवर पडत नाही. चित्रपटातील गाणी लक्षातही रहात नाही.

- Advertisement -

एकूणच चित्रपटाच्या कथेतच दम नसल्यामुळे या सगळ्यांचा प्रभाव जाणवत नाही. चित्रपटाच्या शेवटपर्यंत म्हणावी तशी रंगत चित्रपटात येत नाही. चित्रपटात अनपेक्षीत आलेल्या शेवटामुळे चित्रपटातून नेमका काय संदेश द्यायाचा आहे हेच कळत नाही. एकदरंतीच पुन्हा एकदा मराठी चित्रपटांमध्ये खेळांवर आधारीत असलेला चित्रपट खेळाची नाट्यमयता रंगवताना कमी पडतो.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -