Saturday, August 8, 2020
Mumbai
28.6 C
घर ताज्या घडामोडी ‘जेष्ठ कलाकारांना देखील काम करुन पोट भरु द्या’, अभिनेत्री सरकारवर भडकल्या!

‘जेष्ठ कलाकारांना देखील काम करुन पोट भरु द्या’, अभिनेत्री सरकारवर भडकल्या!

Mumbai
surekha sikri

गेले ३ महिने बंद असलेली चित्रपटसृष्टी आता हळूहळू पर्ववत होत आहे. सरकारने दिलेल्या अटी आणि नियमांचे पालनकरून चित्रीकरणाला आता सुरूवात झाली आहे. मात्र या अटींमध्ये एका अटीमुळे जेष्ठ कलाकार नाराज झाले आहेत. ६५ वर्षांवरील कलाकारांना शूटिंगमध्ये भाग घेता येणार नाही अशी अट सरकारने घातली आहे. महाराष्ट्र सरकारच्या या नियमाविरोधात जेष्ठ अभिनेत्री सुरेखा सीकरी यांनी आवाज उठवला आहे. ‘आम्हाला दाम नकोय तर आम्हाला काम हव आहे’, असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

अभिनेत्री सुरेखा सीकरी यांनी सरकारच्या लॉकडाऊन नियमांविरोधात बोलताना म्हणाल्या, लॉकडाऊनमुळे मी नक्कीच आर्थिक समस्यांचा सामना करत आहे. ज्या मालिकांमध्ये काम केलं त्यांचे पैसे मला अद्याप मिळालेले नाहीत. परिणामी ही आर्थिक टंचाई उद्भवली आहे. मात्र मला माझ्या समस्यांची जाहीरात करायची नाही. कारण मला कोणाकडूनही दान नकोय मला फक्त काम हवंय. सरकारने घेतलेला हा निर्णय चुकीचा आहे. त्यांनी हा नियम त्वरीत रद्द करावा, जेणेकरुन जेष्ठ कलाकार देखील काम करुन आपलं पोट भरु शकतील.”

सुरेखा सीकरी यांनी १९७८ साली किस्सा कुर्सीका या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर ‘नसीब’, ‘सरफरोश’, ‘हेरा फेरी’, ‘देवडी’, ‘बधाई हो’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. त्याचबरोबर १९९० साली सांझा ‘चूल्हा’ या मालिकेतून त्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केलें होते. त्यानंतर त्यांनी ‘कभी कभी’, ‘बुनियाद’, ‘सीआयडी’, ‘केहना है कुछ हमको’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे.


हे ही वाचा – अपुन ताई है…! रियाचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल!


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here