अभिनेत्री सुरेखा सीकरी यांना ब्रेन स्ट्रोक; उपचारासाठी मागितली आर्थिक मदत

बालिका वधू, एक था राजा एक थी रानी आणि परदेस में है मेरा दिल सारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सीकरी यांना ब्रेन स्ट्रोक झाला असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील याी रोड येथे राहणाऱ्या सुरेखा सीकरी यांची तब्येत आज, मंगळवारी सकाळी ११ वाजता अचानक खराब झाली. ज्युस पित असताना त्यांना ब्रेन स्ट्रोक झाला. त्यानंतर त्यांना क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. हे हॉस्पिटल जास्त खर्चिक असल्याचे तेथील नर्सने सांगितले. त्यानंतर त्यांनी बॉलीवूड आणि टीव्ही क्षेत्रातील लोकांशी आर्थिक मदत मागितली.

यापूर्वी सुरेखा सीकरी यांनी २०१८ साली ब्रेन स्ट्रोक झाला होता. त्यामुळे त्यांना अर्धांगवायुचा झकटाही आला होता. चित्रीकरणावेळी त्या पडल्या होत्या. नंतर त्यांची प्रकृती सुधारली होती. त्यांच्या देखरेखीसाठी घरामध्ये एक नर्स असते, असे समजते. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने लॉकडाऊन काळात ज्येष्ठ कलाकारांना शूटींग करण्यास मनाई केल्याचे निर्देश जारी केले होते. यावर सुरेखा सीकरी यांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी आपल्यालाही काम करायचे असल्याची इच्छा व्यक्त केली होती.

हेही वाचा –

आता Corona Test करायची असेल तर आधार कार्ड असणार आवश्यक