सूर नवा ध्यास नवा; मॉनिटरने लावली हजेरी

सूर नवा ध्यास नव्या या कलर्स मराठी वरील रियलिटी शोमधला, सगळ्यांचा लाडका मॉनिटर, बालदिन विशेष भागात प्रेक्षकांना दिसणार.

Mumbai
sur nava dhyas nava
sur nava dhyas nava

‘सूर नवा ध्यास नवा’ या कलर्स मराठीवरील गाण्याच्या रियलिटी शोचे तिसरा पर्व सध्या सुरू आहे. बाकी पर्वांपेक्षा हा पर्व थोडा वेगळा आहे, कारण यंदाच्या या पर्वात ५ ते ५५ वर्षाच्या वयोगटातील स्पर्धक सहभागी झाले आहेत. या शोचे परिक्षक महेश काळे आणि अवधूत गुप्ते असून सूत्रसंचालन अभिनेत्री स्पृहा जोशी करत आहे. यामागील पर्वातील मॉनिटर म्हणून ओळखला जाणारा हर्षद नायबळ नावाचा एक चिमुकला स्पर्धक लोकांचा आणि शोमधील सगळ्यांचाच चाहता झाला होता. या पर्वात तो नसल्यामुळे सगळ्यांनाच त्याची आठवण येते, असे स्पृहाने एका मुलाखतीत सांगितले होते. पण या आठवड्याच्या बालदिन विशेष भागात हा मॉनिटर प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येणार आहे.

१४ नोव्हेंबरला बालदिन साजरा केला जातो आणि त्यासाठीच सूर नवा ध्यास नवाचा देखील एक बालदिन विशेष भाग प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या विशेष भागात गेल्या पर्वातील मॉनिटरसह अंशिका, चैतन्य, सई हे छोटे सुरवीर देखील प्रेक्षकांच्या भेटीस येतील. त्यांची मंचावरची गंमत मस्ती पाहायला मिळेल. स्पृहा आणि मॉनिटरमधील कनेक्शनदेखील पुन्हा एकदा पाहता येणार आहे. सगळ्यांचा लाडका मॉनिटर हर्षद सध्या शाळेत जायला लागला आहे. तर त्याच्या शाळेचे किस्से आणि मस्ती तो या भागात सांगणार आहे. बालदिन विशेष म्हणून प्रेक्षकांसाठी तो बम बम बोले हे गीत सादर करणार आहे.