सुशांत – सारा ब्रेकअपमागे करिना? कंगनाचा आणखी एक खळबळजनक दावा!

kangana -sushant - sara
कंगना ,सुशांत सारा

गेले काही दिवस सततच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. सुशांत सिंग राजपुत केस प्रकरणात तीने अनेकांवर आरोपही केले. यात बॉलिवूडकरांनाही तीने सोडलं नाही. अभिनेत्री खासदार जया बच्चन, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनाही तिने उलट सुलट उत्तर दिली. आता पुन्हा एकदा ती बॉलिवूडच्या कलाकारांवर घसरली आहे.

कंगना आता सारा अली खान आणि सुशांतच्या रिलेशनशीप विषयी बोलली आहे. कंगना म्हणाली की, जे मुव्ही माफिया आहेत, ज्यांनी सुशांतला त्रास दिला. त्याला बॅन केलं..मी त्यांच्यांसोबत स्पष्टपणे बोलली आहे. जे प्रोडक्शन हाऊस आहेत ज्यांनी सुशांतला टार्गेट केलं, त्यांनीच त्याला बॅन केलं. त्यांना फॉलो करणाऱ्या मीडियाने सुशांतच्या कॅरेक्टरवर हल्ला केला. त्याला रेपिस्ट म्हटलं. याच सुसाईड गँगने मला सुध्दा टार्गेट केलं होतं.

कंगना पुढे बोलताना म्हणाली की, जेव्हा सुशांत सारा अली खानला डेट करत होता. तेव्हा या लोकांना हेच वाटत होतं की त्यांच ब्रेकअप व्हावं. या विषयी बोलताना तीने करिना कपूरचंही नाव घेतलं.    करीना कपूर म्हणाली होती, आपल्या पहिल्या वहिल्या हिरोला डेट करू नकोस.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणावर बोलताना कंगना म्हणाली की, आपण सगळ्यांनी हे पाहिलं की कशाप्रकारे सुशांतच्या वडिलांनी पोलिसांच्या कमतेरतेची तक्रार केली. मी ड्रग्ज रॅकेट्सचा भांडाफोड केला, म्हणून मी घाबरले होते. म्हणून मी केंद्राकडे सुरक्षा मागितली. मी मराठ्यांबबात काहीच म्हणाले नाही. राजकीय पक्षांनी इंड्रस्ट्रीतील काही लोकांशी हातमिळवणी केली आहे. मला सुरक्षा मिळाली नसती तर मी सुध्दा साधुंसारखी मारले गेले असते.


हे ही वाचा – SBI बँकेने ATM मधून पैसे काढण्यासाठी आणला ‘हा’ नवीन नियम!