Saturday, August 8, 2020
Mumbai
27 C
घर ताज्या घडामोडी सुशांतच्या एक्स-मॅनेजरची फाइल चुकून डिलीट, मुंबई पोलिसांची माहिती!

सुशांतच्या एक्स-मॅनेजरची फाइल चुकून डिलीट, मुंबई पोलिसांची माहिती!

Mumbai

अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी बिहार पोलीस मुंबईत दाखल झाले आहेत. बिहार पोलीस तपास करण्यासाठी शनिवारी मालवणी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. सुशांतच्या मृत्यूचा त्याची एक्स – मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूशी काही संबंध आहे का? या दृष्टीने बिहार पोलीस शोध घेत आहेत. याचसाठी बिहार पोलीस मालवणी पोलीस ठाण्यात पोहोचले होते. मात्र यावेळी त्यांनी दिशा सालियनशी संबंधित फोल्डर डिलीट झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

बिहार पोलिसांना दिशाच्या आत्महत्येशी संबंधित फोल्डर चुकून डिलीट झाला असून तो पुन्हा मिळवणं शक्य नाही असं सांगण्यात आलं. पोलीस अधिकारी केसशी संबंधित सर्व माहिती शेअर करण्यास तयार होते. पण एका फोनमुळे परिस्थिती अचानक बदलली. बिहार पोलिसांनी फोल्डर पुन्हा मिळवण्यासाठी मदत देऊ केली, पण त्यांना लॅपटॉप देण्यास नकार देण्यात आला.

सुशांतच्या आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वीच दिशाने आत्महत्या केली होती. सोबतच सुशांतच्या आत्महत्येनंतर सुशांतची रुम उघडण्यास मदत करणाऱ्या चावीवाल्याचाही शोध सुरु आहे. ८ जूनला दिशाचा मालाड येथे १४ व्या माळ्यावरुन खाली पडून मृत्यू झाला होता. ही आत्महत्या असल्याचा दावा होता. पण पोलिसांनी हा अपघाती मृत्यू असल्याची शंका व्यक्त केली. तर १४ जून रोजी सुशांत सिंहने वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली.


हे ही वाचा – sushant sing suicide-सुशांतच्या खात्यातून ‘जादूटोण्या’ साठी काढले गेले पैसे


प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here